Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; १० जणांचा मृत्यू, जनावरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

Sambhajinagar News : संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड या सात जिल्ह्यातील ३ हजार ४८७ गावातील १४ लाख ६५ हजार ८७० शेतकऱ्यांच्या ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान
Marathwada Heavy Rain
Marathwada Heavy RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे वित्त आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पावसामुळे तब्बल ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. तर या पावसात १० जणांचा मृत्यू झालाय. तसेच ५२३ जनावरे दगावली आहेत.

मराठवाड्यातील धाराशिव वगळता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड या सात जिल्ह्यातील ३ हजार ४८७ गावातील १४ लाख ६५ हजार ८७० शेतकऱ्यांच्या ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. अर्थात पंचनाम्याअंती या अहवालाला अंतिम आकडा समोर मिळणार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये प्राथमिक अंदाजानुसार ११ लाख ३१ हजार ३२१ हेक्टरवरील जिरायत, १६ हजार २२५ हेक्टरवरील बागायत तर १९ हजार ७२४ हेक्टरवरील फळ पिकाचा समावेश आहे. नुकसानीची ही आकडेवारी २ सप्टेंबरपर्यंतची आहे. 

Marathwada Heavy Rain
Ghati Hospital : 'घाटी'त घोटाळा! हॉस्पिटलचा ऑन पेपर कर्मचारी वेगळा, ऑन ड्युटी तिसराच!, अजब कारनामा उघड!

८८३ गावांमध्ये जीवित व वित्तहानी

मराठवाड्यात जवळपास १० जणांना पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीत जीव गमवा लागला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५, जालना, बीड व लातूरमधील प्रत्येकी १ व हिंगोलीतील दोघांचा समावेश आहे. याशिवाय एक जण या नैसर्गिक आपत्तीत जखमी झाला आहे. याशिवाय ५२३ दुधाळ वोडकाम करणाऱ्या जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये संभाजीनगरमधील ८, जालन्यातील ७३, परभणीतील २६४, हिंगोलीत १०१, नांदेड ३७, बीड १८, लातूरमधील एक व धाराशिवमधील २१ जनावरांचा समावेश आहे. तर मराठवाड्यातील जवळपास १०३ पक्क्या घरांची व ११९ कच्च्या घरांची पडझड झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com