Akola: ५० वर्षांत पहिल्यांदाच कापसाला विक्रमी दर; शेतकरी आनंदात

येत्या काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Akot Market Committee
Akot Market Committeeजयेश गावंडे

अकोला - गेल्या पन्नास वर्षांनंतर पांढऱ्या सोन्याला चकाकी आली असून कापसाने (Cotton) साडे दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत (Akot Market Committee) कापसाला 10 हजार 555 रुपये दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी कापसाच्या दरात घसरण झाली होती माञ आता पुन्हा पांढरं सोनं अकरा हजारांवर जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे. आधी अतिवृष्टी आणि आता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Akot Market Committee
कोळशाच्या हेराफेरीची तात्काळ सीबीआय चौकशी करा, कॉंग्रेस नेत्याची मागणी

सध्या कापूस वेचणीचे काम वेगाने सुरू असून, मजूर मिळत नसल्याने अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे. यंदा कापसाचे वेचणीचे दर प्रति किलो 10 रुपयांवर पोहोचले आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. यावर्षी सर्वच उत्पादनाला हमीभाव पेक्षा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पांढऱ्या सोन्याला तब्बल पन्नास वर्षानंतर झळाळी आल्याने शेतकरी आनंदात आहे. येत्या काही दिवसांत कापसाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com