सोयाबीन पिकांच्या विमाधारकास आगाऊ नुकसान भरपाई मिळणार

लातूर जिल्हयात सुरवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झालेला होता.
सोयाबीन पिकांच्या विमाधारकास आगाऊ नुकसान भरपाई मिळणार
सोयाबीन पिकांच्या विमाधारकास आगाऊ नुकसान भरपाई मिळणारSaam Tv

लातूर जिल्हयात (Latur District) सोयाबीन पिकाचे खरीप- 2021 मध्ये पेरणी झालेले क्षेत्र 4 लक्ष 57 हजार 823 हेक्टर असून संपूर्ण जिल्हयातील 60 महसूल मंडळातून 5 लाख 06 हजार 981 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. लातूर जिल्हयात सुरवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झालेला होता.

दरम्यान जुलै आणि ऑगस्ट-2021 मध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा प्रतिकुल परिणाम सोयाबीन पिकावर झालेला होता. कृषि विभागाचे अधिकारी, विदयापीठ शास्त्रज्ञ आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी सोयाबीन पिक नुकसानीचा नजर अंदाज घेण्यात आला आणि त्यानूसार लातुर जिल्हयातील सर्वच तालुक्यातील सर्व म्हणजे साठही महसुल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊन जोखीम लागू झालेली आहे.

या बाबतीत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधान मंत्री पिक विमा योजना यांनी अधिसुचनेव्दारे शासन निर्णय क्र.प्रपिवियो/2020 प्रक्र.40/11अे दि.29/06/2020 मधील मुददा क्र.10.2,11 व 12 अन्वये सोयाबीन पिकाचे संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25% आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांना आदेशित केल्याचे लातूरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com