Crime : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकास अटक

या घटनेमुळे बनावट कृषी औषधी विकणाऱ्या संचालकांचे धाबे दणाणले आहे.
Buldhana Crime News , Farmers
Buldhana Crime News , FarmersSaam Tv

बुलडाणा : मेहकर तालुक्यामधील उटी येथील शिवकृपा कृषी केंद्राचे संचालक किशोर मोतीराम आंधळे यांना फसवणूक व कॉपीराईट प्रकरणी पाेलिसांनी अटक केली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्याच्या पथकानं जानेफळ पोलीस ठाण्याच्या सहकार्याने आंधळे यांना उटी येथुन अटक (arrest) केली. (Buldhana Latest Marathi News)

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील कृषी केंद्रामध्ये इतर ठिकाणच्या कृषी केंद्रापेक्षा स्वस्त दरामध्ये कीटकनाशके, तननाशके व इतर संबंधित कृषी औषधे स्वस्त दरामध्ये मिळत असल्याने बुलढाण्यासह इतर जिल्ह्यामधील शेतकरी वर्ग जानेफळ येथे औषध खरेदीसाठी येत असतात. अधिक मिळकतीच्या पोटी स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी काही कृषी संचालक, बनावट औषधी निर्माण करून नावलौकिक प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांचे लेबल लावुन, गुणवत्ता नसलेले बनावट औषधी शेतकऱ्यांना विकून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला.

Buldhana Crime News , Farmers
Crime News : धक्कादायक ! पन्नास हजारांची सुपारी देत आईनं मुलास संपवलं; तिघे अटकेत

या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाणे अंतर्गत दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पाेलिसांनी तपास दरम्यान अनेकांना ताब्यात घेतले. त्यानंतर बनावट औषधे हे जानेफळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या उटी येथील रहिवासी जानेफळ येथील शिवकृपा कृषी केंद्राचे संचालक किशोर मोतीराम आंधळे यांच्यावर (कलम 420, 465, 34) गुन्हा दाखल करण्यात आला.

Buldhana Crime News , Farmers
Dongaon : साेन्याच्या मण्यांचा पाऊस पडलाे हाे....! गर्दीमुळं मुंबई नागपूर महामार्ग ठप्प

जानेफळ पोलीस ठाणेच्या सहकार्याने उटी येथून मानवत पोलीस ठाण्याचे कापुरे व त्यांच्या पथकानं किशोर आंधळे यास अटक केली. या घटनेमुळे बनावट कृषी औषधी विकणाऱ्या संचालकांचे धाबे दणाणले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com