अमरावती : दरवर्षी कपाशी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यात दोन वर्षापासून गुलाबी बोंडअळीने थैमान घातल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. परंतु गुलांबी बोंडअळी व कपाशी वरील इतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिसंस्था केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या वतीने दरवर्षी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी हे मार्गदर्शन अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतकऱ्यांना चक्क कृषि किर्तन व भारुडाच्या माध्यमातून करण्यात आले. संस्थेचे यावेळी कीटक शास्त्रज्ञ डॉ.बाबासाहेब फंड व वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.शैलेश गावंडे यांनी कीर्तनकाराचा वेष परिधान करून शेतकऱ्यांना बोंडअळी व्यवस्थापण विषयीं जनजागृती केली.
हे देखील पहा :
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून कीर्तन भारुड या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने माहिती मिळावी म्हणून हा कृषी कीर्तनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम संत नगरी गुरुकुंज मोझरीत राबवण्यात आला. दरम्यान, कृषी कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करणारा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. केंद्र शासन पुरस्कृत 'कीटक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन: गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतींचा प्रसार' (आय.आर.एम.-पी.बी.डब्ल्यू.) या प्रकल्पांतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात तिवसा तालुक्यातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या कृषी कीर्तन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्थेद्वारा विकसित कापुस शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली.
तसेच, कापुस उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान, गुलाबी बोंडअळी चे एकात्मिक व्यवस्थापन, कीडनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात येईल. ही तांत्रिक व शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना सहज समजेल अशा साध्या सोप्या भाषेत कविता, लोकगीते, भारुड इ च्या स्वरूपात 'कृषी कीर्तन' या नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा राज्यात प्रथमच एक पथदर्शी प्रयत्न कीटक शास्त्रज्ञ डॉ.बाबासाहेब फंड आणि वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.शैलेश गावंडे यांनी केला. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांना शेतात नेऊन मार्गदर्शन देखील करण्यात आले. कीर्तनाच्या च्या माध्यमातून बोंडअळी बद्दल जनजागृती उपक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.