Beed Crime News : शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा करार करून पाच जणांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये उकळून साडेबारा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली आहे. परळी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नप्रभा प्रमोद परळीकर (रा. शंकर पार्वती नगर, परळी ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका अॅग्रो फूडस इंडिया प्रा.लि. कंपनीचे परळी शहरात कार्यालय आहे. शेतकऱ्यांकडून अडीच लाख रुपये घेऊन त्याबदल्यात शेळीपालन व्यवसायासाठी शंभर करडू, एक पत्र्याचे शेड, दोन कामगार व महिना २५ हजार रुपये देण्याचा करार काही लाेकांनी केला.
दरम्यान त्यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा कार्यकारी संचालक अजितकुमार हिरवे (रा. कोडोली, जि.सातारा), भागवत तांदळे (रा. चोरपांगरा, ता. लोणार, जि. बुलडाणा), सुधाकर मुंडे, सूर्यकांत गुट्टे (दोघे रा. गंगाखेड, जि. परभणी) व बापूराव मुळे (रा. महातपुरी, ता. गंगाखेड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.