Parbhani News: धक्कादायक! पाच दिवसांआड जगाचा पोशिंदा संपवितोय जीवन; जिल्‍ह्यातील विदारक चित्र

धक्कादायक! पाच दिवसांआड जगाचा पोशिंदा संपवितोय जीवन; जिल्‍ह्यातील विदारक चित्र
Farmer Parbhani News
Farmer Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाला आठ वर्षे पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न या काळात दुप्पट झाले की नाही. हा मंथनाचा विषय असला तरी दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जाणारा बळीराजा पाच दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याची विदारक स्थिती (Parbhani) जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ते बदल होत नसल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra News)

Farmer Parbhani News
Nandurbar News: रेल्वे रूळ क्रॉस करणे जीवावर बेतले; रेल्वेच्‍या धडके युवकांच्या मृत्यू

परभणी जिल्‍ह्यातील जमीन सुपीक आणि काळी कसदार असली तरी मागील काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बदलून टाकले आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. परंतु, ही पिके काढणीला आलीच की अतिवृष्टी, सततचा पाऊस, वादळी वाऱ्यााने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. त्यामुळे शेतकयांसमोर आत्महत्या शिवायपर्याय उरत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी हा कुटुंबातील कर्ता असल्याने त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रशासनाने तत्काळ मदत देणे गरजेचे होते. यावर्षी कापसाला ८ हजार रुपये तर सोयाबीनला १५ हजार रुपये मिळणारा हा दर पिकांवर केलेला खर्चही निघत नाही.

Farmer Parbhani News
Dhule News: वारंवार वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा रास्‍ता रोको

तीन महिन्‍यात १८ आत्‍महत्‍या

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत परभणी जिल्ह्यात अठरा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये जानेवारीत ६, फेब्रुवारी ६ व मार्च महिन्यात ६ जणांनी बाजारभाव, नापिकी, दुष्काळ, वेळेत न मिळणारे पीक कर्ज यासह विविध कारणांनी गळफास लावत आपले जीवन संपविले आहे. मागील वर्षी जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात ७७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. त्यातील ६७ शेतकरी राज्य शासनाच्या १ लाख रुपयांचे मदत देण्यात आले. यातील १० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यातही १६ प्रकरणे मदतीसाठी प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com