Parbhani: सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला; कृषी विभागाचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांची शासनाने उपाय योजना व मार्गदर्शन करण्याची मागणी.
Parbhani News
Parbhani NewsSaam Tv

परभणी - शेतकऱ्यांच्या पाठीशी संकटांची मालिका सुरूच असून पेरणीत सतत पाऊस त्या पिवळ्या मोझ्याक रोगाचे आक्रमण नंतर महिण्याचा खंड आणि आता लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे उत्पादन अर्धे अधिक घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पेरणीचा खर्च ही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

हे देखील पाहा -

पिवळा मोझ्याक, २७ दिवस पावसाचा खंड आता याची कमी की काय म्हणून पुन्हा निसर्गाने लष्करी अळी नुकसानी साठी पाठवल्याचे जिल्हातील शेतशिवारात दिसू लागले आहे. सततचे दमट हवामान, पाऊस या मुळे आता सोयाबीन पिकावर पाने खाणारी लष्करी अळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही अळी सोयाबीन पिकांची संपुर्ण पाणे खात असल्यान प्रकाश संश्लेशन क्रिया मंदावते. परिणामी सोयाबीन पिकात दाने भरण्याची क्रिया सुरू असतानाच असाप्रकार समोर आल्याने अजून उत्पादनात घट येणार हे निश्चित ठरलेले.

Parbhani News
बदलापूरच्या रेल्वे समस्यांसाठी राष्ट्रवादीची रेल्वे परिषद; समस्या थेट रेल्वेमंत्र्यांकडे मांडणार

सततच्या पावसाने शेतात किटकनाशक फवारणी करण्यासाठी ही जाता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाची बिकट अवस्था असतांनाही कृषीविभागाचे कसलेही मार्गदर्शन किवा उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com