बदलापूरच्या रेल्वे समस्यांसाठी राष्ट्रवादीची रेल्वे परिषद; समस्या थेट रेल्वेमंत्र्यांकडे मांडणार

एसी लोकल सुरू झाल्यास शांततेनं विरोध करणार
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv

बदलापूर - रेल्वे समस्यांबाबत शनिवारी जागृत प्रवासी रेल्वे परिषद आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रमोद हिंदुराव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईपासून (Mumbai) ते थेट रेल्वे मंत्र्यांची भेट घेत पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.

हे देखील पाहा -

बदलापूर रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर काही दिवस रेल्वे प्रशासनानं एसी लोकल बंद ठेवली असली, तरी पुन्हा एसी लोकल सुरू करण्याबाबत रेल्वेनं प्रवाशांच्या सूचना मागवल्या आहेत. याबाबत जवळपास दीड हजार निवेदनं रेल्वेला देण्यात आली असून त्यात साधी लोकल बंद करून त्याजागी एसी लोकल सुरू करण्यास विरोध दर्शवण्यात आलाय.

Badlapur News
Pune: लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या तरुणाची आत्महत्या; घरमालकाकडून धक्कादायक माहिती उघड

सोबतच बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवणे, आणि अन्य सोयी-सुविधांबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी आहेत. या सर्वांवर या रेल्वे परिषदेत चर्चा करण्यात आली. यावेळी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे, सुधाकर पतंगराव, अविनाश देशमुख यांच्यासह अनेक सक्रिय कार्यकर्ते आणि प्रवासी उपस्थित होते. एसी लोकल पुन्हा सुरू झाल्यास शांततेच्या मार्गानं आंदोलन करून रेल्वेला एसी लोकल बंद करायला लावू, तसंच रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांकडे दाद मागू, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com