Nagpur : 'अवकाळी' चा फटका: बॅंकेचं कर्ज कसं फेडणार... घर कसं चालणार..., शेतकरी धायमाेकलून रडले (पाहा व्हिडिओ)

कळमना मार्केटमध्ये संत्र्यांची मोठी आवक झाली आहे.
Avkali Paus, Nagpur, Santra, unseasonal rain
Avkali Paus, Nagpur, Santra, unseasonal rainsaam tv
Published On

Unseasonal Rain : अवकाळी पावसानं विदर्भातील शेतकऱ्यांच्या (vidarbha farmers) डोळ्यात पाणी आणलंय. एकिकडे शेतात असलेला शेतमाल पावसानं खराब झाला आहे. दुसरीकडे नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत (nagpur krushi utpanna bazar samiti) विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसाने भिजलाय. (Maharashtra News)

Avkali Paus, Nagpur, Santra, unseasonal rain
Yavatmal News: दुप्पट पैशाच्या आमिषाने डाॅक्टरांची लाखाे रुपयांची फसवणूक; यवतमाळात गुन्हा दाखल

नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत धान्याची हजारो पोती भिजलीय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेलाय. धान्य भिजल्यामुळं शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं माेठं नुकसान होणार आहे.

Avkali Paus, Nagpur, Santra, unseasonal rain
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी सरकारला दिली डेडलाइन

दरम्यान हवामान विभागाने अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे नुकसानीच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटला आणलाय. एकाच वेळेस शेतकऱ्यांनी संत्रा बाजारात आणल्याने कळमना मार्केटमध्ये संत्र्यांची मोठी आवक झालीय.

याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. गेल्या दोन आठवड्यात नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याचे निम्मे दर पडलेय. पूर्वी ६० रुपये किलोनं विकले जाणारी संत्री सध्या २५ ते ३० रुपये किलो विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com