शेतकऱ्यांसाठी कांद्यानी केला वांदा! दर अचानक प्रति किलो 14 रुपयांनी घटले

महागाईचा भडका उडाला आहे.
Onion
Onion Saam Tv
Published On

मुंबई: रशिया- युक्रेनमधील (Ukraine) युद्ध हिट असल्याने बाजारामधील परिस्थती बदलत आहे. महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. पण कांद्याचे दर (Onion) मात्र, कमालीचे गडगडले आहेत. ही परिस्थिती उद्भवल्यामुळे या कांद्याने शेतकऱ्यांना (farmers) अक्षरशः रडवले आहे. कांद्याचे दर अचानकपणे १४ ते १५ रुपये प्रति किलोने नेमके का घटले? मागील २ वर्षामध्ये कोरोनामुळे (corona) बाजारपेठा ठप्प होते. बाजारपेठा (Markets) ठप्प असताना देखील शेतकरी शेतामध्ये राबत होता. त्यात कांदा उत्पादक देखील मागे नव्हते. (Onion prices fell sharply by Rs 14 per kg)

हे देखील पहा-

कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा कांदा कमीत- कमी ५ रुपये किलोने विकावा लागला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला बाजारपेठा खुल्या करण्यात आले आहेत. मात्र, अशी असले तरी कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे आजिबात नाव घेत नाही. कांद्याचे दर हे प्रतिकिलो ८ ते १० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. यामुळे कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवत आहे. शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने दुबार पेरणीचे संकट आले होते, पण यावर त्यांनी मात केली आहे.

Onion
मद्यधुंद 3 तरूणांकडून 34 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

परत एकदा घाम गाळून ३ एकर क्षेत्रात कांदा पिकवला होता. आता आपण मालामाल होऊ, या आनंदात असतानाच कांद्याचे दर मात्र, अचानकपणे गडगडले होते. यामुळे ज्या पिकासाठी त्यांनी सव्वा दोन लाख खर्च करण्यात आले होते. त्या हातातोंडाशी आलेल्या या पिकामधून आता मुद्दल मिळण्याची ही शक्यता धूसर झाली आहे. १० दिवसाअगोदर २२ ते ३० रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण अचानकपणे १० ते १३ रुपये प्रति किलो असे दर घटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com