Apple Ber Farming : अ‍ॅपल बोर शेतीतून लाखोचा फायदा; पारंपारिक शेतीला फाटा देत केली अ‍ॅपल बोर शेती

Nashik News : संपुर्ण क्षेत्रात गेल्या दोन वर्षा पासून अँपल बोराची शेती करण्यास सुरवात केली. योग्य व्यवस्थापन आणि त्याची वेळेवर देखभाल केल्याने गेल्या दोन वर्षा पासून बोराचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे
Apple Ber Farming
Apple Ber FarmingSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिक म्हणून कांदा, मका या पिकाची शेती शेतकरी करीत असतात. मात्र या पारंपरिक शेतीला फाटा देत येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने अँपल बोराची शेती करण्याचा निर्णय घेतला. यातून आता लाखो रुपयांचा फायदा या शेतकऱ्याला होत असून पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळे करण्याचा निर्णय फायद्याचा ठरत आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालूक्यातील जळगाव नेऊर येथिल शेतकरी हरिभाऊ दाते असे अँपल शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. हरिभाऊ दाते यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या संपुर्ण क्षेत्रात गेल्या दोन वर्षा पासून अँपल बोराची शेती करण्यास सुरवात केली. योग्य व्यवस्थापन आणि त्याची वेळेवर देखभाल केल्याने गेल्या दोन वर्षा पासून बोराचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. नाशिकचं नाही तर बाहेर देखील हे बोर विक्रीस जात आहेत. 

Apple Ber Farming
Shirdi Murder Case : दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर; एजंट, अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड

बांधावर मिळतोय २० रुपयांचा भाव 

सध्या अँपल बोराचे सिझन सुरु झाले असून या अँपल बोरांना चांगली मागणी होत आहे. थेट बांधावर २० रुपये प्रति किलो पेक्षा जास्त दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात विक्रीसाठी नेल्यास ३५ ते ४० रुपये इतका दर आकाराच्या मानाने विक्री होत आहे. यामुळे पारंपारिक शेती पेक्षा जास्तीचे उत्पादन आणि चांगला नफा त्यांना मिळत असून अँपल बोर शेती त्यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे.

Apple Ber Farming
Ratnagiri News : शाडूमातीसाठी मूर्तिकारांना मिळणार अनुदान; गणेशोत्सवात होणार फायदा

व्यापारी पोहचताय बांधावर 

दरम्यान अँपल बोर खाण्यास गोड असल्याने याची मागणी चांगली असते. हरिभाऊ दाते यांची अँपल बोरांची शेती असलेल्या ठिकाणी अनेक व्यापारी हे शेतातील बांधावर जाऊन त्याची खरेदी करत असल्याने शेतकऱ्याला त्याचा फायदा होत आहे. अर्थात बांधावरच विक्री होत असल्याने दाते यांचा बाजारात नेण्याचा खर्च देखील वाचत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com