मोदी सरकारने केली नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची धामधूम सुरु असतानाच काल मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केल्याची घोषणा केली
मोदी सरकारने केली नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती
मोदी सरकारने केली नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती- Saam Tv
Published On

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची Cabinet Expansion धामधूम सुरु असतानाच काल मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची Co operative Ministry निर्मिती केल्याची घोषणा केली. सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मंत्रीमंडळ विस्तारात नव्या मंत्रालयाची जबाबदारी कोणाला मिळेल याबाबत उत्सुकता आहे. Narendra Modi Government Created new Co operative Ministry

आतापर्यंत सहकार विभाग हा कृषी Agriculture मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विभाग राहिला आहे. मात्र आता केंद्र सकारच्या Central Government नव्या निर्णयामुळे सहकार हे स्वतंत्र मंत्रालय असेल. नवे मंत्रालय स्थापण्याच्या केंद्रसरकारच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळ सचिवालयातर्फे औपचारिक घोषणा करण्यात आली.

हे देखिल पहा

यापूर्वी मोदी सरकारने कृषी तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाची नावे बदलून अनुक्रमे कृषी व शेतकरी कल्याण आणि शिक्षण मंत्रालय अशी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सकारने समुदाय आधारीत विकासात्मक भागीदारीसाठी आपली कटिबद्धता यातून दर्शविली आहे. सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय अर्थमंत्र्यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेला अनुरूप आहे, असे मंत्रीमंडळ सचिवालयाने म्हटले आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, नव्याने अस्तित्वात येणारे सहकार मंत्रालय देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक रचना तयार करेल. तसेच सहकारी संस्थांना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या जनभागीदारी आधारीत चळवळीला बळकट करण्यासाठी मदत करेल, असे मंत्रीमंडळ सचिवालयाच्या निवेदनात म्हटले आहे. देशात सहकारावार आधारीत आर्थिक विकास माॅडल प्रासंगिक असून त्यात प्रत्येक सदस्य आपली जबाबदारी ओळखून काम करत असतो. नवे मंत्रालय सहकारी संस्थांच्या कारभारात सुटसुटीतणा आणण्यासाठी तसेच आंतरराज्यीय सहकारी संस्थाच्या (एमएससीएस) विकासासाठी कार्य करेल.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com