Nandurbar: दोनशे टन युरिया खताचा साठा उपलब्ध

दोनशे टन युरिया खताचा साठा उपलब्ध
Farmer Urea fertilizer
Farmer Urea fertilizer Saam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात युरीया खताचा तुटवडा जाणवु नये; यासाठी राष्ट्रीय केमीकल फर्टीलायझर रॅक आज नंदुरबारमध्ये (Nandurbar) खाली करण्यात आला आहे. रॅक पॉईन्टवर खत खाली करण्याच्या कामाचा आज खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे. (Nandurbar News Farmer fertilizer available)

Farmer Urea fertilizer
सोनगीर टोल प्रशासना विरोधात ‘आप’ आक्रमक; टोल माफीची केली मागणी

पावसाने (Rain) उसंत दिल्‍याने आता शेतकरी (Farmer) वर्ग हा पिकांना खत देण्याचे काम करत आहे. यामुळे खताची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. अशात खताचा तुटवडा जाणवू नये; याकरीता नंदुरबार जिल्‍ह्यासाठी रॅली खाली करण्यात येत आहे. रॅकच्या या उपलब्ध झालेल्या सोईमुळे जिल्ह्यातील खत तुटवड्याचे निरसन होणार असुन धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या खतांची गरज देखील नंदुरबार येथुन भागणार आहे.

दोनशे टन युरीया

जिल्‍ह्यासाती उतरविण्यात येत असलेल्‍या खतात आज जवळपास 200 टन युरीया खाली करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा कृषी अधिक्षक निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी प्रदीप लाटे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com