Papaya Crop : वाढत्या उष्णतेचा पपईला फटका; फळ चांगले राहण्यासाठी लावले जातेय आच्छादन

Nandurbar News : पपईवर आलेल्या विषाणू जन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पाने गळती होत आहे. परिणामी झाडाला लागवड झालेली फळे उघडी पडली उन्हामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली
Papaya Crop
Papaya CropSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : पावसाळ्यामध्ये लागवड करण्यात आलेल्या पपईचे फळ परिपक्व होत असून ते काढणीला आता सुरवात होत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे. याचा फटका पपई पिकाला बसत असून वाढत्या उष्णतेने फळ खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे फळ चांगले राहण्यासाठी शेतकरी त्यावर आच्छादन लावत आहे. 

नंदूरबार देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात आली आहे. या पपईच्या तोडणीला आता सुरवात झाली आहे. मात्र पपईवर आलेल्या विषाणू जन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात पाने गळती होत आहे. परिणामी झाडाला लागवड झालेली फळे उघडी पडली आहेत. याचे उन्हामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

Papaya Crop
Bird Flu : पोल्ट्रीफार्मवरील कोंबड्यांचे घेतले रक्त नमुने; बर्ड फ्ल्यूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क

फळांवर कागदी आच्छादन 

गेल्या आठवड्या पासून तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे फळे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे. पपई पिकाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पपईच्या फळांवर शेतकरी कागदी आच्छादन लावत आहे. यामुळे पपईचे फळ चांगले राहण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे तोडणी सुरु झाली असून लागलीच याची निर्यात देखील केली जात आहे.   

Papaya Crop
Nagpur News : मुलीला उठवायला आई गेली, रूममध्ये जाताच बसला जबर धक्का; गेम टास्कच्या नादात घडले भयंकर

पपईला २० रुपयांपर्यंत भाव 

दरम्यान उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली असून पपईला चांगला दर मिळत आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक दर मिळत आहे. सध्या पपईला १७ ते २० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. मात्र अचानक तपमानात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची डोके दुखी वाढली आहे. फळ खराब झाल्याने त्याला चांगला भाव मिळणे देखील कठीण होईल.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com