Crop Insurance: अवकाळीत केळीचे मोठे नुकसान; पिकविमा काढताना आता शेतकऱ्यांना अडचणी

अवकाळीत केळीचे मोठे नुकसान; पिकविमा काढताना आता शेतकऱ्यांना अडचणी
Banana Crop Insurance
Banana Crop InsuranceSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात दर वर्षी दहा हजार हेक्टरपेक्षा आधिक क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात येत असते. दर वर्षी येणाऱ्या (Nandurbar) नैसर्गिक आपत्तीचा फटका केळी बागांना मोठ्या प्रमाणात बसत असतो. यावर्षी आता पर्यन्त झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. एकीकडे सरकारकडून मिळणारी मदत अत्यल्प असते. तर दुसरीकडे सरकारने सुरू केलेल्या (Banana Crop Insurance) केळी पिक विम्यासाठी ही (Farmer) शेतकाऱ्यांना अडचणी येत असल्याने केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (Breaking Marathi News)

Banana Crop Insurance
Pimpri Chinchwad News: महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्‍यू

अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यामुळे हे नुकसान आधिक आहे. आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे. तर आगोदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून अजून ही मदत मिळाली नाही. एकीकडे शासनाकडून मिळणारी नुकसान तोडकी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकार थट्टा करत आसल्याचा शेतकऱ्यांनी संगितले आहे.

Banana Crop Insurance
Jalna Crime News: घरात द्यायचा नेहमी त्रास..वडील, भाऊ अन्‌ मुलानेच केला खून; मृतदेह जाळून पुरावा केला नष्ट

शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी मदत नुकसान भरून येण्या इतकी मोठी नसते. तर केळी उत्पादक शेतकरी पिक विमा काढण्यासाठी ग्रामीण भागातून तालुक्याचा ठिकाणी येत असतो. मात्र साईड चालत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे केळी पिकांचे विमा निघाला नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. सरकार देत असलेली भरपाई कमी असते, तर दुसरीकडे विम्यासाठी अडचणी आल्‍यामुळे केळी उत्पादक दुहेरी संकटात आहे.

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असताना सरकार आणि सरकारी यंत्रणा व विमा कंपनीचा मनमानी कारभाराचा फटका बसत आहे. त्यात अजून भर म्हणून शेतकऱ्यांनी नुकसानी संदर्भात ऑनलाइन माहिती पाठविताना अनेक अडचणी येत असल्याने नैसर्गिक नुकसानीसाठी सरकारने निश्चित धोरण ठरविणे महत्वाचे ठरेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com