पिक विम्याची रक्‍कम देण्यास टाळाटाळ; शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

पिक विम्याची रक्‍कम देण्यास टाळाटाळ; शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : पिक विमा योजनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. गेल्या वर्षी नंदुरबार तालुक्‍यात दुष्काळ घोषित असतांना देखील पिक विम्याची रक्कम संबंधित कंपनीने देण्यास टाळाटाळ केली. विमा योजनेतुन पूर्ण नुकसान (Nandurbar News) भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. (nandurbar Avoidance of crop insurance payments Farmers hit the Collector's office)

Nandurbar News
Nagpur: सहा महिन्‍यानंतर कोरोनाने मृत्‍यू; चोवीस तासात १०५ नवे बाधित

पिक विमा योजनेची (Crop Insurance) चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी. यासाठी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, मांजरे, भादवड, ओसरली, शनिमांडळ, वावद, रनाळे, दहिंदुले, जून मोहिदे, हाटमोहिदे या गावांसह १५ ते २० गावातील २०० शेतकऱ्यांनी (farmer) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे (Shiv Sena) तालुका उपप्रमुख कृष्णदास पाटील, सागर इंदानी, दिलीप पाटील, शरद पाटील, पवन काकड, गणेश पाटील, रोहिदास राजपूत, नारायण पाटील, नागेश्वर राजपूत, सचिन शिंदे, बाजीराव मराठे, पवन मराठे, राजाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन चर्चा केली.

भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

मागील वर्षी पिक विमा काढला होता. शेतातील नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामा पिक विमा कंपनीकडून करण्यात आला होता. त्या अनुशंगाने विम्याची पिक कापणी प्रयोग तसेच २०२०-२१ वर्षाचे पीक घटाच्या आधारे रक्कम मिळणे क्रमप्राप्त असतांना देखील पिक विमा कंपनीने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा नुकसान मोबदला दिलेला नाही. रक्कम कापणी प्रयोगाप्रमाणे शासनाच्या निर्देशनुसार पूर्ण दिलेली नाही. त्यामुळे योग्य ती चौकशी होऊन विमा कंपनीला त्वरित नुकसान भरपाईचे निर्देश द्यावेत; असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com