Nanded News : तापमान वाढीमुळे एक एकर क्षेत्रावरील टरबुजाचे नुकसान; शेतकऱ्याचे आर्थिक फटका

Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकरी विनायक देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर एप्रिल महिन्यात टरबुजाची लागवड केली होती.
Watermelon
WatermelonSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: उन्हाळ्यात येणारे टरबूजचे उत्पादन ऑफ सीझनमध्ये घेण्याच्या नियोजनातून शेतकऱ्याने एप्रिलमध्ये टरबुज लागवड केली होती. याचे उत्पादन आता निघण्याची अपेक्षा होती. मात्र तापमान वाढीमुळे टरबुजाला फटका बसला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Watermelon
Pachora News : विहिरीत काम करताना विजेचा झटका; कामगाराचा मृत्यू

नांदेडच्या (Nanded) अर्धापूर तालुक्यातील शेतकरी विनायक देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर एप्रिल महिन्यात टरबुजाची लागवड केली होती. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात टरबुजचे उत्पादन हाती येईल. यामुळे टरबूजला चांगला दर मिळेल; अशी अपेक्षा या शेतकऱ्याला होती. मात्र तापमान वाढीमुळे टरबुजाला (Watermelon) फटका बसला आहे. वाढलेल्या तापमानामुळे फळाला फटका बसून उत्पदनात घाट होण्याची शक्यता आहे.  

Watermelon
Dhule Crime : एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी; दागिने घेऊन चोरटे पसार

तापमान ३८ अंशावर 

नांदेड जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद सध्या होत आहे. त्यामुळे टरबुजला तापमान वाढीचा फटका बसला. टरबूज लागवडीसाठी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च आला होता. मात्र काढणीला आलेले टरबूज खराब झाल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटका बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com