Orange Crop : प्रदूषणामुळे फळधारणाच नाही; शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर चालविली कुऱ्हाड

Nagpur News : सावनेर एमआयडीसी मधील कंपन्यांतून विषारी धूर निघतो. हवेसोबत येणार हा धूर संत्रा झाडाच्या पानावर बसतो. त्यामुळे प्रकाशस्वश्लेषण क्रिया नीट करता येत नाही
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील काही संत्रा बागावर फळधारणा होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी या बागांमधील संत्र्याची झाड तोडण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्याच संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवत आहेत.

नागपूरच्या सावनेर तालुक्यातील गावालगत असलेल्या सावनेर एमआयडीसी मधील कंपन्यांतून विषारी धूर निघतो. हवेसोबत येणार हा धूर संत्रा झाडाच्या पानावर बसतो. त्यामुळे प्रकाशस्वश्लेषण क्रिया नीट करता येत नाही. सोबत झाडावर बसलेल्या धुराच्या थरामुळे नवीन फळ धारणेसाठी लागणारी परागीकरणाची प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे मागच्या तीन ते चार वर्षांपासून या भागात संत्राची सततची नापिकी सुरु आहे.

Nagpur News
Nashik Fraud Case : कांदा खरेदी करत व्यापाऱ्याची साडेसात लाख रुपयात फसवणूक; मनमाड बाजार समितीतील प्रकार

१२ शेतकऱ्यांनी तोडल्या बागा 
मागच्या एक महिन्यात खापा नरसाळा या एका गावातील १२ शेतकऱ्यांनी शेकडो संत्र्याच्या झाडावर कुऱ्हाडीने चालवली आहे. यात शेतकरी संजय जवार हे सांगतात, की प्रदूषणामुळे झाडावर काळपट दूर येतो. तसेच फुलांवर येणाऱ्या धुरामुळे फळधारणा होत नाही. कंपनी येण्यापूर्वी एक झाड २० हजार रुपये उत्पन्न देत होते. अशी अडीचशे झाड माझ्या शेतात होते. दहा ते अकरा वर्षांपासून हे झाड उत्पन्न देत होते. आता मात्र या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. 

Nagpur News
Palghar : चोरीचा मोबाईल घेऊन पळाला अन् कोसळला ५० फूट खोल विहिरीत; चोरटा गंभीर जखमी

दोन एकर बाग तोडली 
तसेच विलास सातपुते यांच्याकडे चार एकर शेती होती. त्यांनी चारही एकरात संत्रा बाग लावली होती. मात्र प्रदूषणामुळे फळबाग येत नसल्याने दोन एकरावरील झाडे आतापर्यंत कापली आहे. उर्वरित दोन एकरातील संत्राचे झाड कापण्याचे काम सुरू असल्याचं ते सांगतात. त्यामुळे अनेक शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com