पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलन
पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलनलक्ष्मण सोळुंके

पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलन

पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या राज्यभरातील साडे चार हजार कर्मचाऱ्यांनी गेल्या दिड महिन्यापासून असहकार आंदोलनास सुरवात केली आहे.
Published on

जालना : पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या राज्यभरातील साडे चार हजार कर्मचाऱ्यांनी गेल्या दिड महिन्यापासून असहकार आंदोलनास सुरवात केली आहे. मात्र, आता या कर्मचाऱ्यानी काम बंद आंदोलन सुरू केल्याने, पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागणार आहे. पशुधन पर्यवेक्षकांच्या या काम बंद आंदोलनामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात मुक्या जनावरांना घटसर्फ, फऱ्या, ईटीव्ही, एफएमडी, लाल्या, खरखुद अश्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या जीवितास धोका जास्त असतो.

हे देखील पहा -

गेल्या दीड महिन्यापासून राज्यात विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. यातच आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज पासून काम बंद आंदोलनाची हाक दिल्याने जालना जिह्यातील 104 पशूवैद्यकीय दवाखान्यांपैकी 64 दवाखान्यांवर या आंदोलनाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे जिह्यातील 8 लाख 891 मुक्या जनावरांच्या उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या आंदोलनामुळे जिह्यातील पशुवैद्यकीय क्षेणी १ च्या डॉक्टरांवरती कामाचा अधिकचा भार पडलाय.

पशुधन पर्यवेक्षकांचे काम बंद आंदोलन
अकोल्यात शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

राज्यासह जिह्यात सुरू झालेल्या आंदोलनामुळे पशुधन पालक शेतकरी अडचणी सापडला आहे. लसीकरण मोहीम बंद पडल्यामुळे जनावरांना होणाऱ्या विषाणूजन्य आजाराचा धोका वाढला आहे. त्यातच आता या काम बंद आंदोलनाला खाजगी पशुवैधकीय व्यवसाय करणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक संघटना यांनी ही पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे मुक्या जनावरांच्या उपचाराचा प्रश्न अधिकच मोठा होण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com