Latur News
Latur NewsSaam Tv

लातुरात आधी अतिवृष्टी, गोगलगाय अन् आता पिवळी पाने पडणाऱ्या रोगाचा धोका

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले, भरीव शासकीय मदतीची आवशयकता
Published on

लातूर - सोयाबीन (Soybean) उत्पादनाचं कोठार अशी ओळख असलेल्या लातूर (Latur) जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. गत महिन्यात अतिवृष्टी, गोगलगायीचा संकट तर आता पिवळी पाने पडून पीक धोक्यात आलं आहे.

यासाठी उत्पादन खर्च जास्तीचा होत आहे. तर त्याप्रमाणात उत्पादनाची हमी नसल्याने शेतकऱ्यांचं (Farmer) आर्थिक गणित पूर्णतः कोलमडलं आहे. आता भरीव शासकीय मदती शिवाय बळीराजाला उभारी मिळणं कठीण आहे.

हे देखील पाहा -

लातूर जिल्हा हा सोयाबीन आणि ऊसाच्या उत्पादनाचं कोठार अशी ओळख आहे जिल्ह्यात लागवडीसाठी जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्र आहे. तर चालू वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला त्याच विपरीत परिणाम कमी होताच गोगलगायीच संकट उभ राहील त्यातून पाऊस सुरू असल्याने आता सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याने आता शेतकऱ्या समोर नवे संकट उभ राहील आहे.

Latur News
Latur: लातूर जिल्ह्याला मंत्रिपद नाहीच, दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल?

या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एकूणच चालू वर्षी खर्च जास्त तर उत्पन्न मात्र अल्प मिळणार असल्याने आता शासकीय भरीव मदतीची अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे. तरच शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com