Agriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकडे

सुबाभूळचे एकरी लाखावर उत्पादन मिळते. कंपनी जागेवर खरेदी करण्यासाठी येते. त्यामुळे खानदेशात सुबाभूळ शेतीचे क्षेत्र आगामी काळात वाढणार आहे
Agriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकडे
Agriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकडे- Saam TV
Published On

(जगन्नाथ पाटील )
कापडणे : खानदेशात शेती करणे कठीण होत चालले आहे. मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. जे मिळत आहेत. ते कमी वेळेत अधिक रोजंदारी घेतात. शेतीमालालाही पुरेसा भाव नाही. अशा स्थितीत शेती करायची कशी, अशी जटिल समस्या निर्माण होत चालली आहे. आता बिगर खर्चिक आणि बिगर मजुरांशिवाय शेती करता येईल का, याची चाचपणी शेतकरी करत आहेत. यातूनच ते सुबाभूळ शेतीकडे वळणार आहेत. (Khandesh Farmers opting for subabhul farming)

सुबाभूळचे एकरी लाखावर उत्पादन मिळते. कंपनी जागेवर खरेदी करण्यासाठी येते. त्यामुळे खानदेशात सुबाभूळ शेतीचे क्षेत्र आगामी काळात वाढणार आहे. धुळे, जळगाव व नंदुरबारमधील शेतकरी (Farmers) गुजरातमधील कागद कंपनींना भेट देत आहेत. सुबाभूळ शेतीची तंत्रे समजून घेत आहेत.


सुबाभूळ झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर लावता येते. सुबाभूळ (सी पी एम ३२) ही वेगाने वाढणारी एक प्रजाती आहे. जी केवळ १८ महिन्यांत परिपक्व होते. सुबाभूळ नायट्रोजन वाढवणारे आहे, हे भविष्यात जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवते. अधिक उत्पादनासाठी कंपनीकडून उच्च दर्जाचे क्लोनल बियाणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले आहे. क्लोनल रोपे मिळू शकतात लाकूड (उभ्या झाडांच्या अवस्थेत) तीन हजार सहाशे प्रति टन किंवा त्यावेळची वाढलेली किंमत किंवा बाजारभाव जे जास्त असेल ते त्या किमतीत विकत घेतले जाणार आहे.

Agriculture News: खानदेशातील शेतकरी वळणार सुबाभूळ शेतीकडे
दोन वर्षानंतर तुळजापुरात भाविकांच्या उपस्थितीत उभारली गुढी

लाकूड तोडणी, वाहतूक आदींचा खर्च कंपनी करणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार झाडे लावल्यास आणि शेतीसारखी काळजी घेतल्यास १८ महिन्यांनी सिंचन पद्धतीने ३०-४० टन प्रति एकर उत्पादन घेता येते. दरम्यान खानदेशातील विजय वाणी, विश्वप्रताप सिंग, भानू पाटील, गोकूळ धुळे, आर.एन. पाटील, भगवान पाटील, हंसराज पाटील, संजय नारायण, किरण जाधव, दत्ता धुमाळ, मनोज ललवाणी, भय्यासाहेब सोनवणे आदींनी पेपर कंपनींना भेट दिली.

चारा म्हणून उपयुक्त
सुबाभूळच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन वाढते. लागवड करणारे शेतकरी सर्व वेळ इतर कामात वापरू शकतात.

सुबाभूळ लागवडीनंतर फारसा खर्च न करता ८-९ वर्षे दर १८ महिन्यांनी ४ ते ५ पिके घेऊ शकता. सुबाभूळ कापणी, वाहतूक आणि विक्रीसाठी वनविभागाची परवानगी किंवा पास आवश्यक नाही. सुबाभूळ लागवड करणारे शेतकरी लाकूड तोडण्यासाठी कंपनीशी लेखी करारही करू शकतात.
- भगवान पाटील, तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना धुळे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com