Jalna News: रब्बीत वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या

रब्बीत वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनास सुरवात केली. रब्‍बी हंगामात पिकांना पाण्याची आवश्‍यकता असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. (Letest Marathi News)

Jalna News
Dhule News: महिला हात दाखवून वाहन थांबवायची अन्‌.. जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

यंदा जिल्ह्यात चांगला (Rain) पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली आहे. पिकंही चांगली तरळू लागली. मात्र पाणी द्यायची वेळ आली असताना वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून बिलाच्या (Jalna News) वसुलीसाठी आडून पाहिले जात आहे. हजारो शेतकऱ्यांची वीज खंडीत केली आहे.

शेतकरी संतप्‍त

आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असताना त्यात आता रब्बी पिकांवर महावितरणच्या रुपाने सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याच्या मागणीसाठी भोकरदन येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालयासमोर शेतकर्यांनी ठिय्या सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com