Jalgaon: फवारणी करतांना विषबाधा; शेतकरी तरुणाचा मृत्यू

फवारणी करतांना विषबाधा; शेतकरी तरुणाचा मृत्यू
Jalgaon Farmer Death
Jalgaon Farmer DeathSaam tv

पाचोरा (जळगाव) : वरखेडी (ता. पाचोरा) येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याला शेतातील पिकावर फवारणी करताना विषबाधा झाली. यात त्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घरातील कर्ता तरुण गेल्याने (Jalgaon) भोई कुटुंबीय कमालीचे खचले आहे. (Jalgaon News Farmer Death)

Jalgaon Farmer Death
Dhule: शेतकरी महिलांची माजी मुख्‍यमंत्र्यांना राखीसोबत अनोखी भेट; पाठविले या आशयाचे पत्र

वरखेडी (ता.पाचोरा) येथील अविनाश भोई असे मयत तरूण शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून त्यांच्याकडे एक एकर जमीन आहे. वरखेडी शिवारातील आपल्या शेतातील पिकांवर 30 जुलैला किटक नाशकाची फवारणी करत असताना त्यांना भुरळ येऊन त्यांची शुद्ध हरपली. त्यांना तात्काळ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मृत्यूशी झुंज देत असतानाच 1 ऑगस्‍टला सायंकाळी त्यांना मृत्यू ओढवला.

घरातील कर्ता गेला

घरातील कर्ता तरूण गेल्याने भोई कुटुंबीय कमालीचे खचले आहेत. आाता घरात कमावता पुरूष राहिलेला नाही. मयत अविनाश भोई यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com