Jalgaon News: अवकाळीचा पुन्‍हा फटका; पिके आडवी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळीचा पुन्‍हा फटका; पिके आडवी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : पारोळा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घातले असून, बुधवारी (ता. १४) मध्यरात्रीच्या (Rain) पावसाने म्हसवे शिवारातील रब्बी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

Jalgaon News
Beed News: खाडाखोड करुन दहावी नापासचा झाला पास; नोकरीही मिळवली, ४ वर्षानंतर उघडकीस आला प्रकार

यंदा वर्षभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे (Jalgaon) खरीप हंगाम धोक्यात गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी शेतीची उत्तम मशागत करून शेतात दादर, गहू, हरभरा कांदा (Onion) यांची लागवड केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी वाढते मजुरीचे दर पाहता कुटुंबासह शेतात मेहनत घेतली. पिकाला लहानाचे मोठे केले. परंतु अवकाळी वादळी पावसाच्या फटक्यामुळे वाढत असलेली पिके जमिनीखाली झोपल्याने शेतकऱ्यांचा पदरी पुन्हा निराशा पसरली आहे.

दादर पीक पूर्णतः जमीनदोस्त

म्हसवे येथील शेतकरी ज्ञानेश्वर वेडू पाटील यांचे म्हसवे शिवारातील गट क्रमांक ४४८/१ मधील १ हेक्टर ९ आर क्षेत्रात असलेले दादर पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले असून, सुमारे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी पाटील यांनी बोलताना सांगितले. याबाबत संबंधित विभागाला कळविले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. म्हसवे शिवारासह तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असून, याबाबत महसूलसह कृषी विभागाने याबाबत योग्य ती चौकशी करून पंचनामे करावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com