जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न
Farmer
Farmer
Published On

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यात करवंदाची शेती हा विषय दूरच आहे. परंतु, नवीन प्रयोग करून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लागवड करत बारा एकर क्षेत्रात करवंदाची शेती फुलविली. यातून लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न शेतकरी मिळवत आहे. (jalgaon-news-New-experiment-farmer-Taxation-flourished-and-income-of-lakhs)

चिंचखेडा बुद्रुक (ता.मुक्ताईनगर) येथील मंगेश जयवंत पाटील या शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही बारा एकर शेतीवर करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्याची करवंद दिल्ली आणि कलकत्ता येथील बाजारपेठेत व्यापाराच्या माध्यमातून जात असते.

दोन मजूर कामाला

जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे मंगेश पाटील हे एकमेव शेतकरी आहे. मंगेश पाटील यांनी ८ हजार करवंदाची वृक्ष लागवड केली आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव यावर येत नसून द्राक्षांसारखे पिक आपण घेऊ शकतो. इतर शेतकऱ्यांनी याकडे वळावे; असे आवाहन या शेतकऱ्यांने केले आहे. त्‍यांच्‍या शेतात परिसरातील दोनशे मजूर नेहमी राबत असतात.

Farmer
दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

करवंदाच्‍या शेतीचा आदर्श

एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती पावसाळाही कमी प्रमाणात होत असल्यामुळे रब्बी, खरिपाचे पिकांचे पाहिजे तसे उत्पन्न सध्या येत नाही. अनेक शेतकरी सध्या हवालदिल आहेत. अशातच या शेतकऱ्याने करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर देखील एक नवीन आदर्श यानिमित्ताने ठेवला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करवंदाची लागवड करावी असे आवाहन देखील या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com