Parbhani Latest Marathi News
Parbhani Latest Marathi NewsSaam Tv

जूनचा अर्धा महिना झाला पण पाऊस नाही; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

या वर्षी बियाण्यांची दुप्पट भाववाढ झाली आहे. त्यामुळे पेरणीयुक्त पाऊस झाल्यावरच पेरणी करा असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

परभणी - जूनचा महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप पाऊस नाही. शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीन (Soybean) खरिप पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस बरसला नाही तर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचा (Farmer) बियाणे व लागवनीचा खर्च होत आर्थिक नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चुराडा होणार आहे व पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवनार आहे. (Parbhani Latest Marathi News)

हे देखील पाहा -

राज्यातील सर्वच भागात आठवडा भरात मान्सून दाखल होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी हलका फुलका पाऊस ही अनेक भागात पडत आहे. पण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी शास्त्रज्ञानी केले आहे.

Parbhani Latest Marathi News
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचा भाव

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पेरणी होत आहे. थोडा पाऊस पडला तरी शेतकरी पेरणी करतात,पण शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अन्यथा दुबार पेरणीच संकट ओढवू शकते. या वर्षी बियाण्यांची दुप्पट भाववाढ झाली आहे. त्यामुळे पेरणीयुक्त पाऊस झाल्यावरच पेरणी करा असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com