...म्हणून मावळमधील शेतकऱ्याने डॉक्टरांना दिल्या १० हजार सिरींज

संपुर्ण जगाचा पोशिंदा असणाऱा शेतकरी राजा यावेळी देखील मदतीला धावून आला
...म्हणून मावळमधील शेतकऱ्याने डॉक्टरांना दिल्या १० हजार सिरींज
...म्हणून मावळमधील शेतकऱ्याने डॉक्टरांना दिल्या १० हजार सिरींजदिलीप कांबळे
Published On

मावळ : मावळ तालुक्यात Maval भाद्रपद बैल पोळा Bailpola आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला आहे. कोरोनाच्या सावट CoronaPandamic मुळे मागील वर्षी साजरा न करता आलेला बैलपोळा यावर्षीदेखील घरगुती पध्दतीनेच साजरा करण्यात येत आहे. मावळ तालुक्यात यावर्षी कोरोना महामारीचे सावट लवकर दूर व्हावे यासाठी बैल पोळ्याच्या दिवशी मिरवणुकीचा खर्च टाळून इंजेक्शन सिरींज देण्यात आल्या आहेत. (In Maval, farmer gave 10,000 syringes to doctor)

हे देखील पहा -

सध्या पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यात सिरींजचा तूटवडा Syringe shortage आहे त्यामुळे मावळ तालुक्यात लसीकरणाचा Vaccination वेग मंदावल्याच बोललं जात आहे अशातच 'संपुर्ण जगाचा पोशिंदा असणाऱा शेतकरी राजा' यावेळी देखील मदतीला धावून आल्याच पहायला मिळालं सामाजिक भान जपत मावळ मधील शेतकरी बाबुराव वायकर Farmer Baburav Vaikar यांनी बैलांच्या मिरवणुकीचा खर्च टाळत मावळ तालुक्यातील नागरिकांना कोरोना लसीकरण Corona Vaccination करण्यात अडचणी होऊ नये, जास्तीत जास्त लसीकरण होवून मावळ तालुका कोरोनामुक्त व्हावा यासाठी दहा हजार सिरींज तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना Health Officer दिल्या आहेत.

...म्हणून मावळमधील शेतकऱ्याने डॉक्टरांना दिल्या १० हजार सिरींज
सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या - एकनाथ शिंदे

बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. तर परोपकारासाठीच आपला जन्म तो शेतकरी या उक्तीला पुन्हा त्यांनी नव्याने सिद्ध करुण दाखवल्याचं बोललं जातं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com