Raigad: सेंद्रिय शेतीतून पिकवली हायब्रीड मिरची; स्मार्ट शेतकऱ्याचा प्रेरणादायक प्रवास...

Organic Farming In Alibaug: अलिबागच्या सचिन बैकर या शेतकऱ्याने केवळ अडीच गुंठ्यात सेंद्रीय शेती केली आहे.
Hybrid peppers grown from organic farming; The inspiring journey of a smart farmer Sachin Baikar
Hybrid peppers grown from organic farming; The inspiring journey of a smart farmer Sachin Baikarराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: शेती व्यवसायातून उत्पन्न कमी मिळत असल्याचे बोलून अनेकजण या व्यवसायकडे पाठ करीत आहे. अलिबाग (Alibaug) तालुक्यातील नागझरी येथील तरुण प्रगतशील शेतकरी (Progressive Farmer) सचिन बैकर (Sachin Baikar) यांनी शेती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे दाखवून दिले आहे. आपल्या बारा एकर जागेत अडीच गुंठा शेतजमिनीवर हायब्रीड सेंद्रिय पद्धतीची मिरची (Hybrid Organic Chili) लागवड करून प्रयोग यशस्वी केला आहे. आतापर्यत सचिन यांनी 300 किलो मिरची उत्पादन घेतले आहे. सचिन यांच्या या सेंद्रिय शेतीला यश आले असून रायगडातील (Raigad) शेतकऱ्यांनीही त्याचा आदर्श घेण्याची गरज आहे. (Hybrid peppers grown from organic farming; The inspiring journey of a smart farmer Sachin Baikar)

हे देखील पहा -

पुणे येथे एका कंपनीत उच्च पदावर, भरमसाठ पगाराची नोकरी असतानाही ती सोडून सचिन बैकर हे आता प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. अलिबाग तालुक्यातील पोयनाड विभागातील नागझरी येथे बैकर याची 12 एकर जमीन आहे. या शेतीकडे आधी त्यांचे दुर्लक्ष होते. मात्र गावी आल्यानंतर आपल्या जागेत काहीतरी करण्याचा मनसुबा केला आणि ते शेती व्यवसायाकडे वळले. आपल्या जागेत त्यांनी विविध पिके घेण्यास सुरुवात केली. आंबा, भाज्या, चारा, विविध पिके, कुक्कुट पालन याकडे ते वळले. शेतात प्रयोग करून सचिन हे यशस्वी झाले आहेत.

सचिन यांनी आपल्या जागेत अडीच गुंठे जागेवर हायब्रीड मिरची लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला. सचिन याला कुक्कुट पालन व्यवसायाचाही फायदा झाला. कुक्कुट पालन करताना काही पक्षी मरतात. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ हे मिश्रण एका ड्रममध्ये ठेवून सेंद्रिय खत निर्माण केले. चार पाच दिवसाने मिर्चीच्या बनविलेल्या वाफ्याना पाटाच्या पाण्याद्वारे ही सरी सोडली जाते. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवड केली आहे. त्यामुळे हिरवीगार मिरची उत्पादन मिळू लागले.

मिरचीला कीड लागू नये यासाठी त्यामध्ये जोडीला झेंडू फुलांची लागवड केली आहे. त्यामुळे मिर्चीवर येणारी कीड ही फुलात बसल्याने मिरचीचा किडीपासून बचाव झाला आहे. विशेष म्हणजे मिरची आठ दिवस बाहेर ठेवली तरी सुकत नाही, वजनात घटही होत नाही. आतापर्यत सचिन यांनी तीन वेळा मिरचीची काढणी केली असून 300 किलो उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला अर्धा किलो मिरची लागत आहे.

Hybrid peppers grown from organic farming; The inspiring journey of a smart farmer Sachin Baikar
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घटले; पेट्रोल- डिझेलच्या भाव कमी होणार?

सचिन बैकर या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचा केलेला प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी शेताला भेट देत आहेत. त्यामुळे भविष्यात रायगडात सेंद्रिय शेतीचा काळ उदयास येण्यास वेळ लागणार नाही. सचिन यांनी केलेल्या या प्रयोगाचा आदर्श आपल्या शेतात केल्यास त्यांनाही नक्की फायदा होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात शेतीचे घटलेले क्षेत्र वाढण्यास मदत मिळू शकते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com