घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसान

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत.
घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसान
घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसानलक्ष्मण सोळुंके
Published On

जालना: जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळ गावात असलेला जलसंधारण विभागाने बांधलेला १५ वर्षे जुना पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळ पास 300 एकर जमिनीवरील पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. (Huge damage to crops due to rupture of pazhar lake in Ghansawangi taluka)

हे देखील पहा -

मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आल्याने आणि गेल्या पंधरा वर्षात तलावाकडे जलसंधारण विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पाझर तलाव पुरून शेकडो एकर जमिनीवरील पिकं वाहून गेले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. हा बंधारा फुटल्याने किमान 300 एकर जमिनीचे शेती क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक शेतांमध्ये पिके खरडून गेली आहेत.

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसान
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक नद्यांना पूर, पिकांचं प्रचंड नुकसान!

इतर शेतांमधील लावणी झालेले पीक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहे. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com