तीन राज्यातील तब्बल १६० भात जातींचे संवर्धन करणारा अवलिया- डॉ .के मनोहर 

गोव्याच्या केंद्रीय किनारी शेती संस्थेतील अनुवंशीक वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.के. मनोहर त्यांनी विविध प्रकारच्या भाताच्या हायब्रीड जाती शोधल्या आहेत. शिवाय त्यांनी तांदळाच्या अनेक जातींचे संवर्धन केले आहे
डाॅ. के. मनोहर
डाॅ. के. मनोहर- Saam TV

पणजी : मध्यम उंची, ठासून भरलेला बांधा , पिढीजात दक्षिणात्य काळा वर्ण, मातीत मळलेली मातकट कपडे ,चिखलातले बूट, शर्टाच्या कॉलरला अडकवलेली यू-टर्न दांड्याची काळी छत्री हे वर्णन ऐकल्यावर आपल्या तो शेतमजूर किंवा अल्पभूधारक शेतकरी  असेल असा वाटेल. या वर्णनाची व्यक्ती शास्त्रज्ञ असू शकते असे म्हटले तर ते आपल्या पचनी पडत नाही. Goa scientist preserved over hundred varieties of paddy crop

पण हे आहेत, गोव्याच्या केंद्रीय किनारी शेती संस्थेतील अनुवंशीक वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.के. मनोहर त्यांनी विविध प्रकारच्या भाताच्या हायब्रीड जाती शोधल्या आहेत. शिवाय त्यांनी तांदळाच्या अनेक जातींचे संवर्धन केले आहे .

डाॅ. के. मनोहर
औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने ५५९ कोटींचे नुकसान - पालकमंत्री सुभाष देसाई

डॉ के मनोहर यांची  सर्वात महत्त्वाची मोठी ओळख म्हणजे गोवा , महाराष्ट्र आणि कर्नाटकातील  सुमारे १६०  भाताच्या जाती गोळा करून त्या जतन करण्याचा अवघड काम ते 11- 12 वर्षे निरंतर करत आहेत. कारण प्रत्येक वर्षी या सर्व प्रकारच्या जाती जमिनीत लावल्या जातात. त्या वाढवल्या जातात. आणि त्यांची काढणी, कापणी आणि मळणी करून परत संवर्धन संरक्षित केल्या जातात. भारतीय कृषी क्षेत्रासाठी त्याचे हे भरीव योगदान मानावे लागले. Goa scientist preserved over hundred varieties of paddy crop

पश्चीम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांचा भौगोलिक भूभाग सारखाच आहे. किनारपट्टी ,सकल- सपाट प्रदेश आणि पश्चिम घाटातील डोंगराळ भाग. या तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. आणि त्यांचे उत्पादन घेतले जाते. काही जाती पारंपारिक आहेत तर काही प्रजाती आहेत . शिवाय त्या प्रदेशनिष्ठ म्हणजे इंडेमिक आहेत. म्हणजेच त्या केवळ त्याच भागात मिळतात . त्यामुळे त्या त्या भागांमध्ये फिरून या पारंपारिक आणि मूळ स्वरूपातील भात जाती शोधून काढून त्या संरक्षणाचं काम अवघड आहे.

वातावरणातील बदल ,ग्लोबल वार्निंग ,योग्य संवर्धनाचा अभाव यामुळे गेल्या 40 वर्षात भारतातील 10 हजार भाताच्या जाती नष्ट झाल्या असून हा वेग असाच राहिला तर देशी भाताच्या अनेक जाती आपण कायमच्या गमवून बसू . यासाठी भाताच्या सध्या अस्तित्वात असलेल्या जातींचे जतन महत्वाचे आहे .

या जातीचे जतन गोव्यात जतन केलेल्या भाताच्या जातींमध्ये गोव्यातल्या आजगो, कुरगुट, सिड्डओ कर्नाटकामधील कग्गा , जडबत्ता, खाराबत्ता , गुडदाणी, शिमिगो, मैसूर सन्ना महाराष्ट्रातील खारेमुणगे , खारारट्टा, बुरारट्टा, जिरगा, मुरगोडी या जातींचा समावेश आहे.Goa scientist preserved over hundred varieties of paddy crop

खाजन शेती पूरक ,योग्य अशा गोवा धान 1234 या चारीही भाताच्या जाती डॉ मनोहर यांनी शोधून काढल्या आहेत. यासाठी कोरगुट, जया, ज्योती यांचा संकर केला आहे शेती संशोधनाच्या कामांमध्ये मूळ जाती प्रजाती खूपच महत्त्वाचे असतात त्यांच्या आधारावर भविष्यातील संशोधन घेतले असते म्हणून अशा प्रकारचे संरक्षण आणि संवर्धन फायद्याचे आणि महत्त्वाचे भूमिका बजावते. अशा प्रकारचे संशोधन कृषी क्षेत्रासाठी पूरक असून भविष्यातल्या पिढीसाठी मोलाचं आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com