Ganesh Festival 2023 : कृत्रिम फुलांना मागणी वाढली, फुलशेतीला उतरती कळा; शेतकरी आर्थिक चिंतेत

निम्म्या किमतीत कृत्रिम फुलांचे हार, तोरण, माळी घेतल्यास संपूर्ण गणेशोत्सव आणि त्यानंतर सणाला या वस्तु वापरतात येतात.
artificial flowers, ganeshotsav 2023
artificial flowers, ganeshotsav 2023saam tv

Pune News : गणेशोत्सवानिमित्त कृत्रिम प्लास्टिक फुलांना आणि त्यापासून तयार केलेल्या विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत फुलशेतीला उतरती कळा लागली आहे असे चित्र केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. (Maharashtra News)

artificial flowers, ganeshotsav 2023
Gadchiroli Floods : गडचिरोलीत मुसळधार, वैनगंगाला पूर; नागपूर, चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस बंद

गणेशोत्सवात झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा, जास्वंद अशा विविध फुलांतुन गणेशोत्सवात सजावट केली जाते. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे देखील फुलांची मागणी करीत असतात. मात्र सध्या शेती फुलांची जागा कृत्रिम फुलांनी घेतल्याने फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

artificial flowers, ganeshotsav 2023
Gokul Dairy AGM : 'गोकुळ' च्या सभेत शौमिका महाडिकांचा आवाज दाबला, गुंड आणल्याचा सतेज पाटलांचा पलटवार (पाहा व्हिडिओ)

शेतीच्या फुलांना मागणी कमी झाल्याने फुलांना बाजारभाव मिळत नाही. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यातच फुलशेती संकटात असताना आकर्षक फुलांची जागा आता कृत्रिम फुलांनी घेतली आहे. त्यामुळे शेतात मोठा भांडवली खर्च करुन फुलवलेली फुलशेती आणि शेतकरी गणेशोत्सवात (ganesh festival) संकटात सापडली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com