सोलापूरच्या दुष्काळी माढ्यात फुलवली अंजीराची शेती

अवघ्या १५ हजार रुपयांच्या उत्पादन खर्चातून त्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा नफा कमावला आहे.
सोलापूरच्या दुष्काळी माढ्यात फुलवली अंजीराची शेती
सोलापूरच्या दुष्काळी माढ्यात फुलवली अंजीराची शेतीभारत नागणे
Published On

भारत नागणे

सोलापूर - शेतात Farm काय पिकतं, या पेक्षा बाजारात काय विकले जाते याचा अभ्यास करुन शेती केली तर केलेल्या कष्टाला यशाची गोड फळे लगडतात. सोलापूरजिल्ह्यातील Solpaur माढा तालुक्यातील सेवा निवृत्त पोलीस अधिकारी आत्माराम शेळके यांनी आपल्या शेतीत अंजीर Anjir लागवडीचा वेगळा प्रयोग केला आहे. खडकाळ माळरानावर एक एकर क्षेत्रामध्ये अंजीर लागवडीतून त्यांनी पहिल्याच वर्षी चांगले उत्पादन घेतले आहे. अवघ्या १५ हजार रुपयांच्या उत्पादन खर्चातून त्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा नफा कमावला आहे. सेवानिवृत्ती नंतरचा उर्वरीत काळ "काळ्या आईची" सेवा करण्यासाठी सत्कर्मी लागल्याचे समाधान ही त्यांना या अंजीर लागवडीतून मिळाले आहे.

सोलापूर जिल्हा आणि दुष्काळ असं येथील समीकरण झाले आहे. तरीही येथील बहुतांश शेतकरी दुष्काळी परिस्थितीवर मात करुन शेती व्यवसायात खंबीरपणे टिकून आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे ऊस, केळी या सारखी नकदी पिके आता शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीची ठरु लागली आहेत.

हे देखील पहा -

त्यामुळे येथील शेतकरी फळ बाग लागवडीकडे वळू लागले आहेत. डाळिंब, द्राक्ष बागांबरोबरच आता अंजीर, पेरु या सारख्या फळ पिकांची लागवड वाढली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव ( खेलोबा) येथील आत्माराम शेळके हे अलीकडेच पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.

सेवा निवृत्तीनंतरचा काळ शहरात घालवण्यापेक्षा तो आपल्या शेतात घालवला तर अधिक समाधान आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल म्हणून त्यांनी गावी येवून शेतीबी करण्याचा निर्णय घेतला. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने त्यांनी शेततळे तयार केले. पावसाचे आणि एका बोअरचे पाणी शेततळ्यात संरक्षीत करुन ठेवले. त्याच पाण्यावर त्यांनी एक एकरामध्ये दहा बाय दहा फूट अंतरावर मागील

सोलापूरच्या दुष्काळी माढ्यात फुलवली अंजीराची शेती
मराठा तरुणांना नक्षलवादी होण्यासाठी भाग पाडू नका : नरेंद्र पाटील

मागील वर्षी अंजीराची लागवड केली. लागवडीपासून त्यांनी अंजीर झाडांना रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा अधिक वापर केला. त्याचा फायदा‌ चांगला झाला. त्यामुळे एक दीड वर्षातच चवदार आणि तजेलदार अंजीर फळ धारणा झाली.

एक आठवड्यापूर्वी त्यांनी अंजीर फळांची काढणी केली. पहिल्याच पिकातून त्यांना एक टन अंजीरचे उत्पादन मि आहे. सरासरी 150 रुपये प्रती किलोच्या भावाने पुणे येथील व्यापार्यांना विक्री केले. त्यातून त्यांना १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. अंजीर बागेत त्यांनी आंतरपिक मिरचीची लागवड केली होती. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळाले. शेळके यांनी आधुनिक शेती करुन तरुण राज्यभरातील तरुण शेतकऱ्यांपुढे अंजीर लागवडीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com