नंदुरबारमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा; दिल्लीतील शेतकरी नेत्यांचीही उपस्थिती!

केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा.
नंदुरबारमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा; दिल्लीतील शेतकरी नेत्यांचीही उपस्थिती!
नंदुरबारमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा; दिल्लीतील शेतकरी नेत्यांचीही उपस्थिती!दिनू गावित
Published On

नंदुरबार : 'शेती बचाव लोकशाही बचाओ' चा नारा देत विविध शेतकरी संघटनांच्या (Farmers Associations) वतीने नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील निंबोणी येथे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे. नवापूर येथील सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या (Satyashodhak Farmers Associations) वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिल्ली (Delhi) येथील शेतकरी आंदोलनाचे नेते उपस्थित झाले आहेत. या सभेसाठी प्रमुख वक्ते अखिल भारतीय किसान महासभेचे कॉम्रेड राजारामसिंग, पंजाब किसान युनियनचे सुखदर्शनसिंग नठ, उपस्थितांना संबोधित करणार आहेत. Farmers Sanvad Yatra on behalf of Farmers Associations

हे देखील पहा-

या सभेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित झाल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत तसेच दुधासह सर्व शेतीमालाला आधारभूत किमतीचा एमएसपी (MSP) गॅरेंटी (Guarantee) कायदा (Law)लागू करा आणि आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा अमलात आणा, 2013 चा भूमी अधिग्रहण कायदा लागू करा अशा विविध मागण्या या संवाद यात्रा द्वारे करण्यात आल्या आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com