पावसाची दडी; शेतकरी 'कावडी'ने पाणी आणून जगवतोय भात पिक !

उगवलेली भाताची रोपे डोळ्यासमोर मरू लागल्याचे दृष्य बघून मुरबाड रोडवरील मानिवली गावच्या शेतक-याने चक्क एक किलोमीटर अंतरावरुन 'कावडीने'पाणी आणून ही भातरोपे जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पावसाची दडी; शेतकरी 'कावडी'ने पाणी आणून जगवतोय भात पिक !
पावसाची दडी; शेतकरी 'कावडी'ने पाणी आणून जगवतोय भात पिक !अजय दुधाणे
Published On

अजय दुधाणे

उल्हासनगर : भातपेरणी केल्यापासून एक महिना झाल्यानंतरही पाऊस Rain पडला नाही. त्यामुळे उगवलेली भाताची रोपे डोळ्यासमोर मरू लागल्याचे दृष्य बघून मुरबाड Murbad रोडवरील मानिवली गावच्या शेतक-याने चक्क एक किलोमीटर अंतरावरुन 'कावडीने'पाणी आणून ही भातरोपे जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण रामू गायकर हा शेतकरी अस करीत असून त्याचे हे अपार कष्ट बघूनतरी 'वरुणराजा'बळीराजावर प्रसन्न होणार का ? असा प्रश्न पडला आहे. Farmers are trying to survive the rice plant

हे देखील पहा-

मुरबाड-कल्याण Murbad Kalyan रोडवर मानिवली Manvali हे छोटेसे गाव. शेतीप्रधान असल्याने येथील शेतक-यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पुर्णपणे ही शेती पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी लक्ष्मण रामू गायकर यांनी छोटी असलेल्या शेतीत ५ जुलै रोजी भातपेरणी केली होती. यावेळी चक्रीवादळामुळे पाऊस पडत असल्याने भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली. Farmers are trying to survive the rice plant

त्यामुळे लक्षमण गायकर हे आंनदी झाले होते. ५ मुली व पत्नी असा मोठा परिवार हा पुर्णपणे शेतीवरच अंवलबून असल्याने ते शेतीत अपार कष्ट करीत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे म्हणावीतशी भात लागवड करता आली नव्हती. पण यावेळी कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्याने संपूर्ण कुंटूबांने शेतीत कष्ट करुन लागवड केली खरी, पण गेल्या १५/२० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे मरु लागली.

पावसाची दडी; शेतकरी 'कावडी'ने पाणी आणून जगवतोय भात पिक !
हिना गावित यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून महाआरती

तर काही सुकत चालली होती. हे द्ष्य बघून या शेतक-याचे मन हेलाऊन गेले. आणि एक कठोर निर्णय घेतला. शेतीपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओलावरुन 'कावडीने'पाणी आणून भाताला पाणी देण्याचा प्रयत्न सुरु केला. या शेतक-याची शेती ही मानिवली रायता या रस्त्याच्या बाजूला असल्याने येणारे जाणारे लोक हे कष्ट बघून हळहळ व्यक्त करुन वरूणराजा आतातरी पड अशी विंनती करीत होते. Farmers are trying to survive the rice plant

याबाबतीत लक्ष्मण गायकर या शेतक-याला विचारले असता ते म्हणाले,पाच मुली थोडीशी शेती, त्यातही असे संकट, आम्ही जगायचे कसे ? पिक मरताना बघू शकत नाही म्हणून मी कावडीने पाणी आणून पिक वाचवतोय, त्यामुळे शासनाने मदत करावी असे या शेतक-याचे म्हणणे आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com