Buldhana Farmers: दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकरी हतबल!

त्रस्त शेतकऱ्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज जामोद येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन दिवसा वीज देण्यात यावी या मागणीसाठी चांगलाच राडा केला.
Buldhana Farmers
Buldhana Farmersसंजय जाधव
Published On

बुलढाणा - जिल्ह्यात लोडशेडिंग मूळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना (Farmer)दिवसा वीज मिळत नसून रात्री उशिरा शेतीसाठी वीज (Electricity) मिळत असल्याने शेतकऱ्यांना मध्यरात्री नंतर थंडीत व जीवावर उदार होऊन कांदा (Onion) लागवड करावी लागत आहे. शिवाय मजुरांना रात्री उशिरा काम करण्यासाठी दुप्पट मजुरी द्यावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. (Buldhana Farmers Latest News)

हे देखील पहा -

यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज जामोद येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन दिवसा वीज देण्यात यावी या मागणीसाठी चांगलाच राडा केला. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com