दहावी नापास मुलाने केली गुलाबाची शेती; आता कमावतो कोरोडो रुपये
दहावी नापास मुलाने केली गुलाबाची शेती; आता कमावतो कोरोडो रुपयेदिलप कांबळे

दहावी नापास मुलाने केली गुलाबाची शेती; आता कमावतो कोरोडो रुपये

दहा गुंठ्यांत केली सुरुवात आता चाळीस एकरावर करतो गुलाब शेती
Published on

मावळ - तालुका हा खरतर भात शेतीच Farm आगार म्हणून ओळखल जात. हजारो हेक्टरवर भात शेती केली जाते आणि येथील शेतकऱ्यांचे Farmer मुख्य व्यवसाय हा भात शेतीच आहे. मात्र सगळे भातशेती व्यवसाय करतात तोच व्यवसाय न करता काहीतरी वेगळं करून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम मावळच्या एका अवलियाने केले आहे.

जेमतेम दहावी नापास शिक्षण झालेल्या मुलाने गुलाबाची Rose शेती केली आहे आणि त्यातून हा मुलगा कोरोडो रुपये कमवत आहे. दहा गुंठ्यांतुन या मुलाने गुलाबाची शेती करण्यास सुरुवात केली आता चाळीस एकरावर हा मुलगा गुलाब शेती करत आहे. परदेशातही याचे गुलाब जातो. फुलांच सर्वात मोठा मार्केट असलेल्या हॉलंडलाही हे गुलाब विकले जातात. 

हे देखील पहा -

भातशेती न करता शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा विचार मावळ मधील मुकुंद ठाकर याला आला. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असल्यामुळे घरातील जेष्ठ मंडळींना फुलशेती बाबत माहिती देऊन तो व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले. त्यानंतर मावळ मधील पवनानगर येथे चार गुंठ्यांत फुलशेती सुरू केली.

सुरुवातीला गुलाबाची लागवड केली. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना मुकुंदला करावा लागला. सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत फुलांची निर्यात सुरू केली. मात्र कालांतराने स्थानिक बाजारपेठेत फुलांना भाव कमी मिळू लागल्याने अनेकदा नुकसान सोसावे लागले. तरी देखील यात यशस्वी होऊन दाखवायची जिद्द होती. 

दहावी नापास मुलाने केली गुलाबाची शेती; आता कमावतो कोरोडो रुपये
भारताच्या नकाशात साकारली 29 विविध राज्यांची वस्त्रपरंपरा!

कालांतराने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फुलांची निर्यात सुरू केली. दुबई, जपान, मलेशिया, ऑस्ट्रेलियात गुलाबाला मोठी मागणी आहे. आता दहा ते पंधरा देशात गुलाबाची निर्यात सुरू केली. व्हॅलेंटाइन डेच्या काळात लाखो गुलाबाची निर्यात करून आठ ते दहा करोडो रुपयांची उलाढाल दरवर्षी केली जाते. विशेष म्हणजे ही कंपनी सांभाळण्यासाठी घरातील सर्व सदस्य काम करतात. सर्व भाऊ आणि नातेवाईक मंडळी मिळून ही कंपनी चालवतात. 

त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान होईल याची भीती न बाळगता काहीतरी वेगळे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न करावं शेतीत नुकसान झाले तर आत्महत्या करण्याचा डोक्यात विचार आणू नका जिद्द ठेवा आपण नक्कीच यशस्वी होऊ असा संदेश या तरुण शेतकऱ्यांने दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com