सोयाबीन बियाणे विक्रीतून शेतकरी बनला कोट्याधीश

घरचे सोयाबीन बियाणे विकून एक शेतकरी कोट्याधीश झाला, यावर कोणालाच विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. त्या शेतकऱ्याने बड्या बियाणे कंपन्यांना टक्कर दिली.
सोयाबीन बियाणे विक्रीतून शेतकरी बनला कोट्याधीश
सोयाबीन बियाणे विक्रीतून शेतकरी बनला कोट्याधीशजयेश गावंडे
Published On

जयेश गावंडे

अकोला : घरचे सोयाबीन soybeans बियाणे विकून एक शेतकरी कोट्याधीश झाला, यावर कोणालाच विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. त्या शेतकऱ्याने बड्या बियाणे कंपन्यांना टक्कर दिली, असून शेतकऱ्यांसाठी शेतीतील एक नवा जोडधंदा शोधून काढला आहे. Farmer became a millionaire from the sale of soybeans

हे शेतकरी बार्शीटाकळी Barshitakali तालुक्यातील टिटवा Titwa गावातील मोहन देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोयाबीन बियाणे हे बड्या कंपनीने मागितले होते. परंतु, त्यांनी ते त्यांना न विकता स्वतःच कोट्यावधी रुपयांचा नफा Profit मिळविला आहे. टिटवा या गावातील मोहन देशमुख यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. ते व त्यांचे भाऊ मिळून, ही शेती करतात. ते दरवर्षी घरचेच सोयाबीन बियाणे पेरतात. मागील वर्षी त्यांनी संपूर्ण सोयाबीनच पेरले होते. Farmer became a millionaire from the sale of soybeans

यातून त्यांना हजार क्विंटल सोयाबीन झाले. भाव वाढतील या आशेने त्यांनी ते ठेवून दिले. कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी हे सोयाबीन बियाणे म्हणून विकले. त्यांनी जर हे सोयाबीन बाजारात विकले असते, तर त्यांना ४० लाख उत्पन्न झाले असते. परंतु, त्यांनी हे बियाणे म्हणून विकल्याने, त्यांनी आताच ७०० क्विंटल विकून एक कोटी उत्पन्न घेतले आहे. ते यातून आणखी २० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न घेणार आहे.

हे देखील पहा-

मागीलवर्षी सोयाबीनवर रोग आणि काढणीच्या वेळी आलेल्या, पावसामुळे सोयाबीन खराब झोले होते. हजारो शेतकऱ्यांना याचा फटका देखील बसला होता. त्यामुळे, त्यांनी हे सोयाबीन तीन ते चार हजाराच्या आत विकले. परिणामी, ज्या शेतकऱ्यांकडे चांगले सोयाबीन होते, त्यांनी ते भाव वाढेल म्हणून ठेवून दिले. सोयाबीनला सुरवातीला कमी भाव मिळाला. नंतर भाव वाढत गेला. Farmer became a millionaire from the sale of soybeans

सोयाबीनचा भाव बाजारात ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. शेतकऱ्यांना इतका जास्त भाव कधीच मिळाला नाही. यामुळे त्यांनी घरातील होते, नव्हते ते सर्व सोयाबीन बाजारात विकले. बीजवाई पण शेतकऱ्यांनी विकली. शेतकऱ्यांकडे बियाणेच उपलब्ध नाही. सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाणे नाही. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडेही मोजकेच बियाणे राहिले आहे.

खासगी कंपनीच्या बियाण्यांकडे शेतकरी जास्त वळला नाही. यामुळे बाजारात सोयाबीन बियाणे मिळणे कठीण झाले होते. मोहन देशमुख यांच्याकडे असलेल्या सोयाबीनला बड्या कंपनीने मागणी केली होती. परंतु, त्यांनी ते बियाणे त्यांना विकले नाही. जादा भावाने त्यांच्याकडून बियाणे खरेदीसाठी कंपनी तयार झाली होती. तरीही त्यांनी कंपनीला बियाणे विकले नाही. Farmer became a millionaire from the sale of soybeans

सोयाबीन बियाणे विक्रीतून शेतकरी बनला कोट्याधीश
शेतकऱ्यांना मिळाले शेतमाल विक्री करिता शाश्वत व्यासपीठ

देशमुख यांच्याकडे भरपूर सोयाबीन बियाणे आहे, अशी माहिती कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांना मिळाली. देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल. त्यासोबतच बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी बियाणे विक्रीचे गणित त्यांना समजून सांगितले. यातून तुम्हाला दरवर्षी होणारा फायदा तो बियाणे म्हणून विकल्यास दुपट्टीत जाईल, असे समजावून सांगितले.

जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी भेट घेऊन, त्यांना हे बियाणे शेतकऱ्यांना विकण्यास सांगितले. शेवटी देशमुख यांनी सोयाबीन बियाणे घरीच ठेवून ते शेतकऱ्यांना विकले. १०० रुपये ते १२० रुपये प्रति किलो बियाणे त्यांनी शेतकऱ्यांना विकले. बाजारात घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना भेटले नाही. परंतु, यांच्याकडे शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन बियाणे विक्रीस भेटले. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून बियाणे खरेदी केले. त्यांच्याकडून अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. गरीब शेतकऱ्यांना तर त्यांनी ९० रुपये किलोनेच सोयाबीन बियाणे विकले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com