शेतकऱ्यांचा शेतमाल चोरून लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धान्य जप्त

हिंगोली सह विदर्भात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मधील धान्य लंपास करणाऱ्या टोळीचा हिंगोली गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल चोरून लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धान्य जप्त
शेतकऱ्यांचा शेतमाल चोरून लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धान्य जप्तसंदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली Hingoli सह विदर्भात Vidharbha शेतकरी व व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मधील धान्य लंपास करणाऱ्या टोळीचा हिंगोली गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अगोदरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अस्मामानी-सुलतानी नैसर्गिक संकटांना कंटाळलेला असताना, मागील काही वर्षांपासून धान्य चोरणाऱ्या टोळीने शेतकऱ्यांन सह व्यापाऱ्यांच्या नाकात दम आणला होता.

हिंगोली तालुक्यातील बासंबा गावात ता. 27 एप्रिल रोजी, धान्य चोरीला गेलेल्या तक्रार दाखल झाली होती, या गुन्ह्याचा तपास करत असताना, हिंगोली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, यांच्या पथकाने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे देखील पहा-

धक्कादायक बाब म्हणजे या टोळीचा प्रमुख असलेला आरोपी हसन हा मूळचा वाशिम Washim जिल्ह्यातील कारंजा येथील असून, तो दिवसा चोरी करण्याच्या ठिकाणी रेकी करून पूर्ण माहिती गोळा करायचा, आणि त्यानंतर मध्यरात्री साथीदारांना घेऊन , शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर उडीद जो मिळेल तो , शेतमाल घेऊन पसार व्हायचा

हा चोरीचा माल लंपास करण्यासाठी आरोपीने आकाराने मोठी असलेली झायलो कार वापरली होती. चोरी केलेला माल जास्त प्रमाणात बसावा यासाठी आरोपीने गाडी मधील सर्व शीट देखील काढून टाकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरून लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धान्य जप्त
आमदार पुत्रांच्या लग्नाला नागरिकांसह आमदार खासदारांची तोबा गर्दी

दरम्यान, पोलिसांनी आता या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली झायलो कार, विविध ठिकाणाहून चोरी केलेले धान्य, यासह चोरीचे इतर साहित्य जप्त केले आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी हिंगोली पोलीस दलाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिली असून, आपापल्या भागात कोणी संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांनशि संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com