पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर

गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी तब्बल दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत.
पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर
पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूरअभिजित घोरमारे
Published On

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदिया Gondia जिल्ह्यात पावसाअभावी तब्बल दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 20 टक्केच रोवण्या पुर्ण झाल्या असून बळीराज्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जर चार- पाच दिवसात पाऊस Rain आला नाही तर पुन्हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडणार आहे.

यंदाच्या वर्षीचा जुलै July महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने Rain जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील Hector रोवण्या खोळंबल्या आहेत. तर हवामान विभागाचे Weather Department अंदाज यंदा वांरवार खोटे ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची Farmers चिंता वाढली आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 81 हजार हेक्टरवर धान पिकाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने Agriculture Department केले आहे. जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने आतापर्यंत केवळ 20 टक्के रोवण्या झाल्या आहेत. तर 80 टक्के रोवण्या होणे अद्यापही शिल्लक आहे.

पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर
कोट्यावधी खर्चुनही वसई-विरार महापालिकेचा 'स्मार्ट प्लॅन' फेल?

गोंदिया Gondia जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण 29.8 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 363.7 मीमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सलग पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. हवामान विभागाने यंदा 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र हा अंदाज to estimate सुरुवातीपासूनच चुकत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

आकाशात दररोज मेघ येतात, मात्र पाऊस हजेरी लावत नसल्याने वातावरणात उकाडा Heat वाढला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com