अहो आश्चर्य! शेवगा झाला मटणापेक्षा महाग; भाव तेजीत

औरंगाबाद शहरातील सगळ्याचं भाजी मार्केटमध्ये सध्या शेवग्याच्या भावाची चर्चा सुरू
अहो आश्चर्य! शेवगा झाला मटणापेक्षा महाग; भाव तेजीत
अहो आश्चर्य! शेवगा झाला मटणापेक्षा महाग; भाव तेजीतSaam Tv

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सगळ्याचं भाजी मार्केटमध्ये सध्या शेवग्याच्या भावाची चर्चा सुरू आहे. कारण ४०० रुपये ते ५०० रुपये किलो असा शेवग्याचा शेंगाचा भाव झाला आहे. त्यामुळे ग्राहकाला तर सोडाच भाजी मंडईतील विक्रेत्यांना सुद्धा शेवग्याच्या शेंगा आणणे परवडत नाही. त्यामुळे औरंगाबादमध्ये मटन- चिकनापेक्षा शेवगा महाग झाला आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाली.

हे देखील पहा-

आता पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, शेवग्यासोबत टोमॅटो, गवार, कोबी, बटाट्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पावशेर शेवग्याच्या शेंगासाठी ग्राहकांना तब्बल शंभर ते सव्वाशे रुपये मोजावे लागत आहेत. शेवग्याच्या शेंगाचे हे दर चिकनपेक्षा तिपटीने अधिक तर मटणाच्या बरोबरीत आले आहेत. त्यामुळे इतका महाग शेवगा खायचा तरी कसा असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

अहो आश्चर्य! शेवगा झाला मटणापेक्षा महाग; भाव तेजीत
मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! बनावट नोटांची रक्कम देऊन केली 4 लाखांची फसवणूक

हिवाळ्यात दरवर्षी शेवगा महागतो. त्यात यावर्षी आवक कमी झाल्यामुळे शेवग्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ठोक विक्रेत्यांकडेही शेवगा येत नसल्यामुळे शेवगा बाजारातून गायब होणार का असाही प्रश्न पडत आहे. मटनापेक्षा शेवगा महाग असं म्हंटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण सध्या भाजी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा तोऱ्यात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com