कमी शेतामध्ये 'या' पिकाची लागवड; कमी कष्टात मिळाले जास्त उत्पन्न

परभणी तालुक्यातील पाथरी रोड येथील जांब शिवारात भीमराव पवार या प्रगतिशील शेतकऱ्याने अवघ्या अडीच एकर शेतामध्ये 'ड्रॅगन फ्रुट' या फळाची लागवड केली, पवार यांनी अहमदनगर हैदराबाद आणि पुणे येथून रोपे विकत आणले आणि अडीच एकर शेती मध्ये एक हजार रोपांची लागवड केली.
कमी शेतामध्ये 'या' पिकाची लागवड; कमी कष्टात मिळाले जास्त उत्पन्न
कमी शेतामध्ये 'या' पिकाची लागवड; कमी कष्टात मिळाले जास्त उत्पन्नगोविंद काटकर
Published On

गोविंद काटकर

परभणी : पारंपारिक पद्धतीने Traditional Method करत असलेल्या शेतीत पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसायात असलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागते. त्यात आर्थिक अडचणी ही शेतकऱ्यांच्या नशिबी आहेच. मात्र तीच शेती अत्याधुनिक पद्धतीने Sophisticated methods केल्यास शेतकऱ्यांना कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवता येते. परभणी तालुक्यातील पाथरी रोड येथील जांब शिवारात भीमराव पवार या प्रगतिशील शेतकऱ्याने अवघ्या अडीच एकर शेतामध्ये 'ड्रॅगन फ्रुट' या फळाची लागवड केली, पवार यांनी अहमदनगर हैदराबाद आणि पुणे येथून रोपे विकत आणले आणि अडीच एकर शेती मध्ये एक हजार रोपांची लागवड केली.

हे देखील पहा-

ड्रॅगन फ्रुट या पिकाला सुरुवातीला एकरी चार लाख रुपये खर्च असून या रोपाचा आयुष्य 30 ते 40 वर्ष आहे. विशेष म्हणजे पवार यांनी शेतामध्ये संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर केला त्यामुळे त्यांना उतपन्न ही चांगला झाला. शिवाय पवार यांना त्यांच्या उच्च शिक्षित मुलाचा सहकार्य ही लाभले बाजारात ड्रॅगन फ्रुटला मागणी ही चांगली आहे. साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलोने हे फ्रूट बाजारात विकले जाते. त्यातून पवार यांना एकरी सहा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या लाल आणि पांढरा फळ उपलब्ध आहे. फळ विक्री साठी पवार यांनी आता ऍडव्हान्स बुकिंग ही चालू केली आहे .

कमी शेतामध्ये 'या' पिकाची लागवड; कमी कष्टात मिळाले जास्त उत्पन्न
आईपासून दूर गेलेल्या मांजराच्या 5 पिल्लांची अवघ्या 8 तासात घडवली भेट

योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर आणि इच्छा शक्ती असेल तर कमी शेतातुन जास्तीतजास्त उत्पन्न मिळवता येते हे भीमराव पवार या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे . शेतीला जोड धंदा म्हणून फळबागच्या विचार ईतर शेतकऱ्यांनी ही करावा व ड्रॅगन फ्रुटची लागवड करत अधिक उत्पन्न मिळवावे असा सल्ला भीमराव पवार ईतर शेतकऱ्यांना देत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com