कपाशी, सोयाबीन पिकांवर रोगाचे आक्रमण

कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन नाही
कपाशी, सोयाबीन पिकांवर रोगाचे आक्रमण
कपाशी, सोयाबीन पिकांवर रोगाचे आक्रमणSaam Tv

संजय राठोड

यवतमाळ - मागील वर्षी बोंड अळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांनी Farmer यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशी, सोयाबीन Soyabean पिकाची लागवड केली. पीक वाढत असताना पिकावर बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीड प्रकारांनी आक्रमण केले असताना कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार ही खरीप हंगामातील पिकांवर असते. मागील काही वर्षापासून खरीप हंगामच शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. यंदाही शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होऊन शेती केली. पिकांची वाढ होत असताना किडीने आक्रमण केले. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत.

हे देखील पहा-

मात्र, त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाते. कृषी केंद्र चालक आपल्याच मर्जीप्रमाणे शेतकर्‍यांना औषधी देतात. त्याचाही फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

कपाशी, सोयाबीन पिकांवर रोगाचे आक्रमण
आगामी काळात सिनेट निवडणूकांवर युवा सेनेचाच भगवा : युवासेना सचिव वरूण सरदेसाई

या संकटात शेतकरी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून मार्गदर्शन मागत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मागील वर्षी बोंड अळीमुळे नुकसानीची मदत मिळाली नाही त्यामुळे आत्महत्या करायची का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com