आगामी काळात सिनेट निवडणूकांवर युवा सेनेचाच भगवा : युवासेना सचिव वरूण सरदेसाई

आगामी काळात सिनेट निवडणूकांवर युवा सेनेचाच भगवा : युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई;
varun sardesai
varun sardesai

जळगाव : तरूण वर्ग युवासेनेकडे आकर्षित होत आहे. येत्‍या काळात त्‍याचे परिणाम दिसतीलच व युवा सेना वाढताना दिसेल. विद्यापीठांच्‍या सिनेट सदस्‍य निवडणूकांचा विचार केल्‍यास मुंबई विद्यापीठात सर्वच्‍या सर्व सदस्‍य युवा सेनेचे राहिले असून, संघटनात्‍मक बांधणी करून सिनेटच्‍या निवडणूका युवा सेना लढेल व भगवा फडकवेल; असा दावा युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला. (jalgaon-news-yuva-sena-leader-varun-sardesai-tour-jalgaon-and-university-sinet-election)

युवा संवाद अंतर्गत युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हे उत्‍तर महाराष्‍ट्र दौऱ्यावर आहेत. जळगावातील दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी हजर होते.

सरदेसाई म्‍हणाले, की गेल्‍या काही अनेक वर्षांपासून युवा सेनेत काम करणाऱ्यांना पुढे आणायचे आहे. यात नवीन कार्यकत्‍र्यांना तालुका, जिल्‍हा पातळीवर उभे करून युवा सेनेची चांगली टीम तयार केली जाणार आहे. हेच युवा कार्यकर्ते दुपटीने काम करतील असा विश्‍वास देखील त्‍यांनी व्‍यक्‍त केला. तसेच कोरोनाच्‍या काळात जो संवाद कमी झालेला होता; तो संवाद करण्यासाठी दौरा आहे. या माध्‍यमातून संघटना कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवायची आहे.

varun sardesai
सभा सुरू असताना सभागृहात आणून टाकला कचरा; धुळे मनपात विरोधकांची घोषणाबाजी

ठाकरे साहेबांची लोकप्रीयता वाढली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्‍यमंत्री झाले. यानंतर कोरोना सुरू झाला. या काळात मुख्‍यमंत्री ठाकरे साहेब यांची राज्‍यातच नव्‍हे तर देशात लोकप्रीयता वाढली. या लोकप्रीयतेचा उपयोग होईलच असा विश्‍वास देखील त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

युवासेनेतर्फे मॉफ सीईटी

कोरोनाच्‍या काळात युवकांसमोर सर्वात मोठा प्रश्‍न हा बेरोजगारीचा निर्माण झाला आहे. ही केवळ राज्‍यात किंवा देशातच नव्‍हे तर जगभरातील प्रश्‍न आहे. परंतु, युवा सेना गेल्‍या दीड वर्षांपासून युवा स्‍क्रीन उपक्रम राबवत आहे. यामार्फत काही स्‍कील युवकांना मिळू शकतील. तसेच अकरावीच्‍या विद्याथ्‍र्यांच्‍या सीईटीसाठी मॉफ सीईटीचे आयोजन केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com