Dhule News Heavy Rain
Dhule News Heavy Rain Saam tv

Dhule News: पावसाची संततधार सुरू; भर पावसात भात लावणीला सुरवात

पावसाची संततधार सुरू; भर पावसात भात लावणीला सुरवात
Published on

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा भात लागवडीसाठी असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. याठिकाणी पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. यात आज सकाळपासूनच पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. परंतु, भर पावसात भात लावडीला सुरवात करण्यात आली आहे. (Dhule News Heavy rain)

Dhule News Heavy Rain
Dhule: भयंकर..जेवणासाठी पत्नीचा खून; प्रेमविवाहाचा झाला धक्कादायक शेवट

साक्री (Sakri) तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाल्यामुळे भात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळपासून रिमझिम पावसाचा जोर सुरू असल्याने भर पावसात भात लागवड केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी सलग तीन दिवस दमदार पावसाने (Dhule News) हजेरी लावत या परिसरामध्ये सर्व जलमय परिस्थिती झाल्याचे बघावयास मिळाले होते. परंतु त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाचा जोर पुन्हा सुरू झाल्याचे बघावयास मिळत आहे.

छत्री हाता धरत लागवड

भात लागवडीसाठी आवश्यक असलेला दमदार पाऊस झाल्यानंतर आता भात लागवडीला सुरुवात झाली आहे. परंतु सकाळपासूनच रिमझिम पावसाची संततधार सुरू असल्यामुळे भर पावसात छत्री हातात धरत शेतकऱ्यांना (farmer) भात लागवड करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com