गारपीटीने नुकसान; आमदार मंजुळा गावित यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

गारपीटीने नुकसान; आमदार मंजुळा गावित यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
Manjula Gavit
Manjula GavitSaam tv
Published On

धुळे : दोन दिवसांपूर्वी साक्री तालुक्यामध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आज आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. (dhule Hail damage Inspection by Agriculture Officer including MLA manjula Gavit)

Manjula Gavit
सुसाईड नोट लिहून तरूणाने घेतला गळफास

गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीला आलेल्या (Wheat) गहू, ज्वारी-दादर, हरभरा व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीही शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यात ९१ गावांत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. काही गावातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

भरपाई लवकर मिळवून द्या

कृषी अधिकाऱ्यांना पाहणी करून लवकरात लवकर पंचनामा करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com