शेतकऱ्यांना डिझेलचे वाढलेले दर परवडेना; ट्रॅक्टरएवजी पुन्हा एकदा बैलजोडीचा आधार

शेतकऱ्यांना डिझेलचे वाढलेले दर परवडेना; ट्रॅक्टरएवजी पुन्हा एकदा बैलजोडीचा आधार
Farmer
Farmer

धुळे : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल– डिझेल व इंधन दरामध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत असून शेतकऱ्यांना देखील हा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कारण शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर शेतकरी करत असतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे शेती कामासाठी ट्रॅक्टर वापरणे परवडत नाहीये. (dhule-news-Farmers-cannot-afford-increased-diesel-rates-again-pair-of-oxen-instead-of-a-tractor)

ट्रॅक्टरला शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असते. गेल्या दीड- दोन वर्षांपासून कोरोणामुळे आधीच बाजारपेठा बंद होत्या आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकलेला माल बाजारपेठेमध्ये विकता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने देखील दडी मारल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा वापर करणे परवडत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा ट्रॅक्टरचा वापर बंद करत बैलाच्या मदतीने शेतीची मशागत करण्यास शेतकऱ्याने सुरुवात केली आहे.

Farmer
रेशन प्रणालीने जन्माला घातला नवीन व्यवसाय; गहू तांदूळ आहे का..सकाळीच गल्लीत घुमतो आवाज

आंतर पिकांच्‍या मशागतीसाठी ट्रॅक्‍टर एवजी बैलजोडी

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील उच्चशिक्षित शेतकरी सचिन भावसार यांनी इंधनाचे भरमसाठ वाढलेले दर बघता आपल्याकडे असलेला ट्रॅक्टरचा शेतातील वापर बंद करीत पुन्हा एकदा बैलांच्या मदतीने शेतीची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. भावसार यांची धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे 13 एकर शेती आहे. यामध्ये भावसार हे पपई, बोर, मका, लिंबू, कांदे, कापूस ही पिके घेत असतात. यापूर्वी त्यांनी बैलांचा वापर कमी करीत ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला होता. परंतु डिझेलचे गगनाला भिडणारे वाढलेले दर बघता आता त्यांना देखील ट्रॅक्टर शेतीसाठी वापरणे परवडत नाही. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा पारंपारिक पद्धतीने बैलांचा शेतीसाठी वापर करणं सुरू केल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com