एक लाखावर शेतकऱ्यांना पीककर्ज; ११ एप्रिलपासून वाटपाचा लाभ

एक लाखावर शेतकऱ्यांना पीककर्ज; ११ एप्रिलपासून वाटपाचा लाभ
Crop Loan
Crop LoanSaam tv

धुळे : धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी नव्याने पीककर्ज वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने वितरीत होणार आहे. प्रथम (Crop Loan) कर्ज भरणा, प्रथम नवीन कर्ज प्राप्ती या धोरणानुसार सरासरी एक लाखांवर सभासदांना कर्जवाटप होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली. (dhule news crop loans to over one lakh farmers Benefit of distribution from 11th April)

Crop Loan
बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; 3 मुन्नाभाई एमबीबीएसवर आरोग्य प्रशासनाची कारवाई

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्या, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभासद, बँकेमार्फत वैयक्तिक पीककर्ज घेणारे सर्व सभासद, सामान्य सभासद आदींना २०२२-२०२३ मधील हंगामासाठी नवीन पीककर्ज दिले जाईल. त्यासाठी अध्यक्षांसह संचालक मंडळाने ११ एप्रिलपासून पीककर्ज उपलब्धतेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तसेच बँकेने (Dhule) धुळे व नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा घेतली. त्यात काही पिकांसाठी कर्ज दर मंजूर झाले.

बँकेतर्फे आवाहन

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्‍चित केलेल्या पीककर्ज दरानुसार आणि नाबार्डच्या धोरणाप्रमाणे जिल्हा बँक पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय व मच्छामारीसाठी रूपे केसीसी क्रेडिट कार्डमार्फत कर्जवाटप करेल. कृषीपूरक उद्योगांतर्गत वैयक्तिक व सहकारी संस्थांमार्फत २०२२-२०२३ साठी कन्झम्शन कर्ज ७५ टक्के दिले जाणार आहे. यात २५ टक्के वाढ केली आहे. थकीत कर्जदारांनी यंदा ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास त्यांनाच कर्जपुरवठा करण्यात येईल. संपूर्ण कर्जवाटप रूपे केसीसी कार्डद्वारे होईल. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार या प्रोत्साहन रक्कमेचा लाभ मिळणार आहे. लाभासाठी कर्जदार सभासदांनी ३१ मार्चपर्यंत मागील वर्षाच्या पीककर्जाची परतफेड करावी. यात बँक धोरणाप्रमाणे फक्त मुद्दल रकमेची परतफेड करावी लागणार आहे. सभासदांना लाभाचे आवाहन संचालक मंडळासह बँकेचे अध्यक्ष कदमबांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक जी. एन. पाटील यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com