Weather: ढगाळ वातावरण; वातावरण बदलाचा फटका शेती पिकाला

ढगाळ वातावरण; वातावरण बदलाचा फटका शेती पिकाला
Cloudy weather
Cloudy weathersaam tv
Published On

धुळे : गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या वातावरणाचा फटका शेती पिकाला बसण्याची दाट शक्यता आहे. या ढगाळ वातावरणापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांतर्फे (farmer) औषध फवारणी करून पिकांचे रक्षण करण्यासाठीची धडपड बघावयास मिळत आहे. (dhule news Cloudy weather Climate change hits agricultural crops)

Cloudy weather
प्रशासनाची एक चूक; रस्त्यावरच करावे लागताय अंत्यसंस्कार

राज्‍यात पुन्‍हा अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यानुसार शनिवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) झाले असून गार वारे देखील वाहू लागले आहेत. यातच पाकिस्‍तानमध्‍ये उठलेल्‍या धुळीच्‍या वादळाचा परिणाम देखील वातावरणावर झालेला पाहण्यास मिळत आहे. मात्र खराब वातावरणामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पिक वाचविण्याचीच धडपड

गेल्या महिन्यामध्ये देखील अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा वातावरण बदलाचा फटका शेती पिकाला बसण्याची दाट भीती व्यक्त होत असल्यामुळे शेतकऱ्यांतर्फे आपल्या शेतातील पिके वाचवण्यासाठी प्रयत्न करतांना शेतकरी दिसून येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com