बुलढाणा : विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती (market committee) म्हणून खामगाव बाजार समितीकडे पाहिलं जात. या बाजार समिती मध्ये अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district)शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. या बाजार समितीमध्ये 'सेस'' च्या रुपाने करोडो रुपये दरवर्षी जमा होत असतात. आज शुक्रवारी या बाजार समिती मधील व्यापारी वाढत यांनी अचानकपणे बंद पुकारल्याने आपला माल विक्रीसाठी आणलेले शेतकरी सकाळपासून त्रस्त झाले आहेत मागण्या मान्य होईपर्यंत खरेदी विक्री सुरू करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी अडचणी भूमिका घेतली आहे. (Closure of traders in Khamgaon market committee)
हे देखील पहा-
खामगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणारे व्यापारी अडते यांनी आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली नाही. अचानक पणे बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्यापारांनी खरेदी केलेला शेतमाल असो किंवा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाच्या चोरीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याला आवार घालावा, बाजार समीतीच्या आवारात झालेल्या शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहाराच्या संदर्भात आकारण्यात येत असलेला 'मंडीसेस'' बिलाची पडताळणी करुन आकरण्यात यावा.
तसेच व्यापारी बांधवांनी मंडीमध्ये खरेदी केलेला शेतमाल बिलाप्रमाणेच मार्केट कमीटीच्या मुख्य दरवाज्यातुन बाहेर नेण्यात आला एवढाच मर्यादीत "गेटपास''देण्यात यावे, "मंडी सेस' ची आकारणी करतांना "गेटपास'' (Getpass) चा आधार न घेता बिलाचा आधार घेण्यात यावा, शेतकरी गहु, ज्वारी, उडीद, मुंग, मका तीळ, तुवर या प्रकारातील शेतमाल खान्यासाठी थोड्याफार प्रमाणत घरी घेऊन जात असतात. अश्या शेतमालाचा सुध्दा "मंडी सेस'' वसुल व्हावा इत्यादी मागण्यांच्या पूर्ततेसाठी खरेदी विक्री सुरू करणार नसल्याचे व्यापारी अडचणी भूमिका घेत बाजार समिती बंद ठेवली या संदर्भात एक निवेदन सुद्धा बाजार समितीला देण्यात आलेला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.